वॉशिंग्टन : रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये एमर्जन्सी लँडिंग दरम्यान प्रवासी विमानाला लागलेल्या आगीत 41 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना अमेरिकेमध्ये खासगी विमानालाअपघात झाला आहे. लास वेगासहून जाणारे हे विमान मेक्सिकोमध्ये कोसऴले असून यामध्ये 13 जण ठार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, बम्बार्डियर चॅलेंजर 601 जेट विमानाने शनिवारी रात्री उशिराने लास व्हेगासहून मॉन्टेरीकडे उड्डाण केले होते. यावेळी रविवारी उत्तरी मेक्सिकोमध्ये कोएहिला राज्याच्या शेजारी या विमानाशी संपर्क तुटला होता. विमान रडारवरून गायब झाल्याने तातडीने तपास सुरु करण्यात आला होता. आज या विमानाचे अवशेष सापडले.
या विमानामध्ये दोन पायलट आणि 11 प्रवासी होते. विमानाच्या अवशेषांवरून कोणीही जिवंत राहिले नसल्याची भीती व्यक्त होत आहे.
रशियात सुखोई प्रवासी विमानानं मॉस्को विमानतळावरुन उत्तर रशियातल्या मोरशांस्कला जाण्यासाठी उड्डाण केलं होतं. यामध्ये 73 प्रवासी आणि 5 कर्मचारी होते. विमानात दुर्घटनेवेळी एकूण 38 जण होते. यातल्या 41 जणांचा जीव वाचवण्यात यश आल्याची माहिती या अपघाताचा तपास करणाऱ्या पथकाचे प्रवक्ते स्वेतलाना पेट्रेन्को यांनी दिली. विमान झेपावताच त्यातून धूर निघू लागला. याची माहिती वैमानिकानं विमान वाहतूक नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर विमानानं एमर्जन्सी लँडिंग केलं.