शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

खाजगी लष्कर, बोईंग, जेट आणि ३०० लक्झरी कार..., कोण आहे मलेशियाचा नवा राजा सुलतान इब्राहिम इस्कंदर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 13:15 IST

जोहोर राज्याचा १७वा राजा म्हणून इब्राहिम इस्कंदर यांनी  शपथ घेतली आहे.

Ibrahim Iskandar : सुलतान इब्राहिम इस्कंदर यांची मलेशियाचा नवीन राजा म्हणून निवड करण्यात आली. इब्राहिम इस्कंदर हे मलेशियातील जोहोर राज्याचा सुलतान आहे. या देशात नऊ वंशीय मलय राज्य शासक आहेत, ज्यांना फिरत्या आधारावर पाच वर्षे राजाची भूमिका स्वीकारण्याची जबाबदारी दिली जाते.

जोहोर राज्याचा १७वा राजा म्हणून इब्राहिम इस्कंदर यांनी  शपथ घेतली आहे. मलेशियाची संघीय राजधानी क्वालालंपूर येथील नॅशनल पॅलेसमध्ये इब्राहिम इस्कंदर शपथ घेतली. दरम्यान, सुलतान इब्राहिम इस्कंदर यांच्या मालमत्तेची बरीच चर्चा आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, राजा यांची संपत्ती ५.७ अब्ज डॉलर आहे.

सुलतान इब्राहिम इस्कंदरच्या संपत्तीमध्ये रिअल इस्टेट, खाणकाम ते दूरसंचार आणि पाम तेल यासारख्या अनेक उद्योगांचा समावेश आहे. त्यांच्याकडे ३०० पेक्षा जास्त आलिशान गाड्या आहेत, ज्यामध्ये त्यांना कथितरित्या ॲडॉल्फ हिटलरने भेटवस्तू दिलेल्या एका कारचा समावेश आहे. तसेच, त्यांच्याकडे निळ्या रंगाचे बोईंग ७३७ सह खाजगी जेट देखील आहे. याशिवाय, या राजघराण्याकडे खाजगी लष्कर देखील आहे.

जोहोरमधील कोट्यवधी डॉलरच्या फॉरेस्ट सिटी डेव्हलपमेंट प्रकल्पातही  इब्राहिम इस्कंदर यांचा मोठा वाटा आहे. सिंगापूरसोबत हाय-स्पीड रेल्वे लिंक प्रकल्पात त्यांचा सहभाग आहे. याशिवाय, यू मोबाईलची २४ टक्के भागीदारी आहे. तसेच, त्यांच्याकडे सिंगापूरमध्ये ४ अब्ज डॉलर किमतीची जमीन आहे, त्यांच्या पत्नीचे नाव जरीथ सोफिया आहे. ती देखील राजघराण्यातील आहे. ती ऑक्सफर्डची पदवीधर आणि लेखिका आहे.

मलेशियाचे राजे काय करतात?मुस्लिम बहुल देशात राजा इस्लामचा संरक्षक म्हणून काम करतो. संघराज्य घटनेनुसार राजाने काही अपवाद वगळता पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार कार्य करणे आवश्यक आहे. राजाला पंतप्रधान नियुक्त करण्याची परवानगी आहे. 

टॅग्स :MalaysiaमलेशियाInternationalआंतरराष्ट्रीय