लॉस एंजल्स : बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने २०१६ चा ‘पीपल्स चॉईस अवॉर्ड’ पटकावला आहे. अमेरिकन टी.व्ही. मालिका ‘क्वान्टिको’तील भूमिकेसाठी प्रियंकाला हा अवॉर्ड मिळाला. या मालिकेत तिने प्रशिक्षणार्थी एफबीआय एंजटची भूमिका साकारली होती. पीपल्स चॉईस श्रेणीत प्रियंकासमोर एमा रॉबर्टस्, जेमी ली कर्टिस, ली मिशेल आणि मार्शिया गे हार्डन यासारख्या प्रसिद्ध हॉलीवूड-टीव्ही अभिनेत्रीचे तगडे आव्हान होते. मात्र, ते पेलत प्रियंकाने नवीन टी.व्ही. मालिका श्रेणीतील ‘पीपल्स चॉईस अवॉर्ड’ आपल्या नावे केला. हा अवॉर्ड पटकावणारी ती पहिली भारतीय अभिनेत्री ठरली आहे. या पुरस्काराची निवड चाहत्यांच्या मतदानाद्वारे करण्यात येते.अवॉर्ड स्वीकारल्यानंतर प्रियंका म्हणाली की, क्वान्टिकोसाठी मतदान करणाऱ्या सर्वांचे आभार. माझे अमेरिकेतील हे पहिलेच वर्ष... आणि मला एवढा भरभरून प्रतिसाद मिळाला यावरूनच अमेरिकेच्या महतीचा अंदाज आला. मला स्वीकारल्याबद्दल सर्वांचे आभार.’ (वृत्तसंस्था)प्रियंकाने टिष्ट्वटरवरूनही चाहत्यांचे आभार मानले. प्रियंकाने लिहिले आहे, ‘मी भाग्यवान आहे. मला मत दिलेल्या सर्वांचे आभार. प्रियंकाने टिष्ट्वटरवर चषकासोबतचे आपले छायाचित्र टाकले आहे. ‘क्वान्टिको’ हा प्रियंकाचा पहिला हॉलीवूड प्रोजेक्ट होता. या चित्रपटातील तिच्या भूमिकेची खूप प्रशंसा झाली.
प्रियंकाला अमेरिकेत पीपल्स चॉईस अवॉर्ड
By admin | Published: January 08, 2016 3:27 AM