ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. २८ - बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा व्हाईट हाऊसमधील वार्षिक करस्पॉडंट डिनरच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासोबत भोजन घेणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून प्रियांका या कार्यक्रमाला उपस्थित रहाणार म्हणून चर्चा होती.
स्वत: प्रियांकाने टि्वट करुन व्हाईट हाऊसमधील करस्पॉडंट डिनरला उपस्थित रहाणार असल्याची माहिती दिली आहे. अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मिशेल ओबामाही या कार्यक्रमाला उपस्थित रहाणार आहेत.
'क्वाटिंको' या अमेरिकन शो मधील एफबीआय एजंटची प्रियांकाची भूमिका अमेरिकेत गाजली. या रोलमुळे तिला जागतिक स्तरावर ओळख मिळाली असून, ती आता बेवॉचमध्येही दिसणार आहे.
येत्या शनिवारी ३० एप्रिलला व्हाईट हाऊसमध्ये करस्पॉडंट डिनरचा हा कार्यक्रम होणार आहे. एका चाहत्याने सोशल मिडीयावर प्रियांकाला तू डिनरला उपस्थित रहाणार का ? म्हणून प्रश्न विचारला होता. त्यावर तिने हो असे उत्तर दिले.
बेवॉच या आपल्या आगामी हॉलिवूड चित्रपटाच्या चित्रीकरणाबद्दलही तिने माहिती दिली आहे. या डिनर कार्यक्रमाला विल स्मिथ,
पिंकेट स्मिथ, केरी वॉशिंग्टन, किम कार्डाशियन अशा बडया हस्ती उपस्थित रहाणार आहेत.
काय आहे करस्पॉडंट डिनर कार्यक्रम
करस्पॉडंट असोशिएशन ही व्हाईट हाऊसमधील बातम्यांचे वृत्ताकंन करणारे पत्रकार, निर्माते, कॅमेर ऑपरेटर यांची एक संघटना आहे. दरवर्षी ही संघटना व्हाईट हाऊसमध्ये डिनर कार्यक्रम आयोजित करते. पत्रकारीतेतल्या शिष्यवृत्तिचा पैसा उभा करण्यासाठी दरवर्षी ही संघटना हा भोजन समारंभाचा कार्यक्रम आयोजित करते.
Yes I will be attending @4_mejohttps://t.co/CnhWjH3a2t— PRIYANKA (@priyankachopra) April 27, 2016