शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

पाकिस्तानमध्ये आणखी एक शस्त्रू ठार! CRPF ताफ्यावरील हल्ल्यातील मास्टरमाईंडची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2023 11:40 AM

२०१६ मध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यातील मास्टरमाईंडची पाकिस्तानमध्ये हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे.

२०१६ मध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यातील मास्टरमाईंडची पाकिस्तानमध्ये हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. ही हत्या अज्ञात हल्लेखोरांनी केली. लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख दहशतवादी अदनान अहमद उर्फ ​​हंजला अदनान याची कराचीमध्ये हत्या केली. २०१६ मध्ये पंपोरमध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याचा हंजाला मास्टरमाईंड होता. या हल्ल्यात ८ जवान शहीद झाले, तर २२ जवान जखमी झाले होते.

"पप्पा लवकरच मरणार", उपचारासाठी फिरत होता लेक; सोनू सूद झाला 'देवदूत', म्हणाला...

हंजलाने २०१५ मध्ये जम्मूच्या उधमपूरमध्ये बीएसएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात बीएसएफचे २ जवान शहीद झाले तर १३ बीएसएफ जवान जखमी झाले. या हल्ल्याचा तपास NIA ने केला आणि ६ ऑगस्ट २०१५ रोजी आरोपपत्र दाखल केले. या दोन्ही हल्ल्यांमध्ये हंजला पाकिस्तानात बसून दहशतवाद्यांना सूचना देत होता. जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर आणि पुलवामा भागात झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात हंजलाचा मोठा हात होता. 

हंजलाला पीओकेमधील लष्कर कॅम्पमध्ये नव्याने भरती झालेल्या दहशतवाद्यांची दिशाभूल करण्यासाठी पाठवण्यात आले होते, जे दहशतवादी भारतात घुसून दहशतवादी हल्ले करण्याच्या तयारीत होते. अदनानला लष्कर कम्युनिकेशन एक्स्पर्ट असेही म्हटले जाते. हंजलाचा मृत्यू हा लष्कर प्रमुख हाफिज सईदसाठी मोठा धक्का मानला जात आहे. अदनान अहमद उर्फ ​​हंजला अदनान हा लष्कर प्रमुख हाफिजच्या जवळचा होता. २-३ डिसेंबरच्या रात्री अज्ञात हल्लेखोरांनी ४ गोळ्या झाडून हे हत्याकांड घडवून आणले. कडेकोट बंदोबस्तात अदनानची हत्या करण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अदनान अहमदला त्याच्या सुरक्षित घराबाहेर गोळ्या घालण्यात आल्या, गोळी झाडल्यानंतर त्याला पाकिस्तानी लष्कराने गुप्तपणे कराची येथील रुग्णालयात दाखल केले. ५ डिसेंबर रोजी त्याचे निधन झाले. हाफिजसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. हंजलाने अलीकडेच रावळपिंडीहून कराचीला आपला ऑपरेशन तळ हलवला होता.

टॅग्स :Pakistanपाकिस्तान