लंडन - ब्रिटनमधील एका व्यक्तीने त्याच्याकडे असलेल्या घराच्या विक्रीसाठी एक जबरदस्त ऑफर आणली आहे. या तीन मजली घराची किंमत ३.७ कोटी रुपये एवढी आहे . घरामध्ये ४ मोठे बेडरूम, मोठे ईट-इन किचन, डायनिंग एरिया, लिव्हिंग रूम एवढी व्यवस्था आहे. घरामध्ये स्टायलिश फर्निचर आणि थंडीमध्ये फायर प्लेसचीही व्यवस्था आहे. दरम्यान, या व्यक्तीने दिलेल्या ऑफरनुसार लॉटरी विजेत्याला २८० रुपयांच्या तिकीटामध्ये एक आलिशान घर देण्यात येणार आहे.
हे घर दरमहा १८८,००० रुपये दराने भाडेतत्त्वावर देता येऊ शकते. या घरासाठी डॅनियल, जेसन आणि विल ट्विनफोर यांनी लॉटरीची व्यवस्था केली आहे. केंब्रिज न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार ट्वेनफोर बंधूंना स्टॅम्प ड्युटी आणि लीगल फीस असा गोष्टींची व्यवस्था करण्यासाठी सुमारे १५५,००० तिकिटे विकावी लागतील. जर १५०० तिकिटांची विक्री झाली नाही तर विजेत्यांना तिकिटाच्या पावतीमधील ७० टक्के रक्कम देण्याची ऑफर लॉटरीचे आयोजन करणाऱ्यांनी दिली आहे.
या घरासाठी काढण्यात येणारी लॉटरी जिंकणाऱ्या विजेत्याला केवळ हे आलिशान घरच मिळणार नाही, तर ते तेथे कुठलेही भाडे न भरता राहू शकतील. येथे फर्निश्ड किचनपासून सर्व सुविधा उपलब्ध आहेत. हे घर केंट मेडवे परिसरात आहे. लंडनमधून येथे ट्रेनने तासाभरात पोहोचता येते. मेडवे मध्ये असलेल्या या चार बेडरूम असलेल्या घरामध्ये एका कुटुंबासाठी आवश्यक असणारे सारे काही आहे. हे ऐतिहासिक शहर संस्कृती आणि कलांच्या बाबतीत समृद्ध आहे. घराजवळ दोन रेल्वे स्टेशन्स आहेत. येथून लंडन व्हिक्टोरिया आणि लंडन सेंट पॅनक्रॉस येथे एका तासात पोहोचता येते.