लाहोर: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या निवासस्थानाबाहेरील कारवाई गुरुवारपर्यंत थांबविण्याचे निर्देश लाहोर उच्च न्यायालयाने बुधवारी दिले. यामुळे इम्रान खान यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
इम्रान खान यांच्या संभाव्य अटकेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा कर्मचारी आणि इम्रान खान यांचे समर्थक यांच्यात झालेल्या संघर्षानंतर न्यायालयाचा हा आदेश आला आहे. इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाने मंगळवारी लाहोर उच्च न्यायालयात पोलिसांच्या कारवाईला आव्हान दिले होते.
५९ पोलिस जखमी
पीटीआय नेते फवाद चौधरी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर पंजाबचे महानिरीक्षक-जनरल, मुख्य सचिव आणि इस्लामाबाद पोलिस प्रमुखांना समन्स जारी केल्यानंतर पोलिसांनी इम्रान खान यांच्यावरील ही कारवाई थांबविली. पीटीआय कार्यकर्त्यांसोबत झालेल्या झटापटीत ५९ पोलिस जखमी झाले आहेत. अनेक नागरिकही जखमी झाले आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"