कराची - टीव्ही डिबेट शो दरम्यान नेते आणि पत्रकारांमध्ये टोकाचा वाद-विवाद झालेला पाहायला मिळतो. पाकिस्तानातील एक प्रकरण समोर येत आहेत ज्यामध्ये एका लाईव्ह टीव्ही डिबेट शोदरम्यान मारहाणीचा व्हिडीओ सोशल मिडीयात व्हायरल झाला आहे. या शो दरम्यान चर्चेत सहभागी असणाऱ्या दोन पाहुण्यांमध्ये काही कारणावरुन वाद होता. हा वादा विकोपाला जाऊन अखेर त्याचं रुपांतर मारहाणीत झाल्याची घटना घडते.
लाइव्ह टीव्ही शो दरम्यान हे दोन्ही पाहुणे जागेवरुन उठून एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करतात. त्यानंतर चर्चेत सहभागी असणाऱ्या अन्य पाहुणे आणि अँकर यांची तारांबळ उडालेली पाहायला मिळते. सध्या हा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय त्यावर लोकही मजेशीर कमेंट करताना दिसत आहे.
न्यूज लाइन विद अफताब मुगेरी या नावाचा शो पाकिस्तानी चॅनेलवर सुरु होता. त्यावेळी पाकिस्तान सरकारमध्ये सत्ताधारी पक्षाचे एक नेता पाहुणे म्हणून सहभागी होते. तर अन्य पाहुणे म्हणून कराची प्रेस क्लबचे अध्यक्ष इम्तियाज खान उपस्थित होते. या दोघांमध्ये काही मुद्द्यावरुन वाद सुरु झाला. हा व्हिडीओ एका पाकिस्तानच्या पत्रकाराने आपल्या सोशल मिडीयावर शेअर केला आहे. या व्हिडीओत पीटीआयचे नेते मंसूर अली सियाल यांनी इम्तियाज अली धमकवताना दिसत आहे. इम्तियाज खान ज्या पद्धतीने आपली बाजू मांडत होते ते सहन न झाल्याने मंसूर अली सियाल यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी इम्तियाज यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
जेव्हा इम्तियाज अली आपलं म्हणणं मांडत होते. त्यावेळी मंसूर अली सियाल यांचा आवाज वाढला. ते जागेवरुन उठले आणि इम्तियाज यांना मारु लागले. इम्तियाज यांना मंसूर अली यांनी मारल्यानंतर त्यांनीही मंसूर यांना धक्काबुक्की केली. या मारहाणी दरम्यान इतर पाहुणे आणि अँकर यांनी मध्यस्थी करत मारहाण सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पुन्हा मंसूर अली सियाल आपल्या जागेवर येऊन बसले, इम्तियाज हेदेखील खुर्चीवर बसले अन् डिबेटला पुन्हा सुरुवात झाली.