लंडन : ब्रिटनचे युवराज चार्ल्स यांनी रशियाचे अध्यक्ष पुतीन व नाझी हुकूमशहा हिटलर यांची तुलना केली असून, पुतीन यांचे युक्रेनबाबतीत वागणे हिटलरसारखे आहे, असे म्हटले आहे. कॅनडा येथील दौर्यात पोलंडच्या एका ज्यू महिलेशी बोलताना प्रिन्स चार्ल्स यांनी ही तुलना केली. ही महिला दुसर्या महायुद्धाच्या काळात पोलंडमधून हिटलरच्या हिंसाचाराला भिऊन कॅनडात पळून आली होती. तिच्याशी बोलताना प्रिन्स चार्ल्स म्हणाले, पोलंडमध्ये हिटलरने जे केले, तेच पुतीन आता युक्रेनमध्ये करीत आहेत. चार्ल्स यांचे हे बोलणे राजघराण्याने फारसे प्रसिद्ध होऊ दिले नाही; पण ब्रिटिश प्रसारमाध्यमांनी ते चांगलेच उचलून धरले. वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर मुख्य बातमी म्हणून ती प्रसिद्ध झाली. पूर्व युक्रेनमधील रशियन समर्थक बंडखोरांना पुतीन यांचा पाठिंबा असून, ब्रिटनचा त्याला विरोध आहे. आंतरराष्टÑीय पातळीवर पुतीन यांनी क्रिमिया रशियात जोडून घेतल्याबद्दल त्यांच्यावर टीका केली जाते. (वृत्तसंस्था) क्रिमियातील पुतीन यांची कारवाई दुसर्या महायुद्धातील जर्मनीच्या हल्ल्याप्रमाणे असल्याची टीका सर्रास केली जात आहे.
‘पुतीन यांचे वागणे हिटलरसारखे’
By admin | Published: May 22, 2014 3:01 AM