Putin Health Status: नव्या व्हिडिओमध्ये अस्वस्थ दिसले राष्ट्रपती पुतिन, गंभीर आजाराच्या बातम्या येत असतानाच Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 08:17 PM2022-06-15T20:17:13+5:302022-06-15T20:20:16+5:30
राष्ट्रपती पुतीन क्रेमलिन येथे एका पुरस्कार समारंभासाठी उपस्थित होते. यावेळी बोलताना ते काहीसे अस्वस्थ दिसून आले.
Putin Health Status: रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांचा एक नवा व्हिडिओ जबरदस्त वाहायरल होत आहे. या व्हिडिओने त्यांच्या प्रकृतीसंदर्भात चिंता निर्माण केली आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, पुतिन ब्लड कॅन्सरचा (Blood Cancer) सामना करत आहेत. न्यूयॉर्क पोस्टच्या एका वृत्तानुसार, राष्ट्रपती पुतीन क्रेमलिन येथे एका पुरस्कार समारंभासाठी उपस्थित होते. यावेळी बोलताना ते काहीसे अस्वस्थ दिसून आले. ते उभे राहण्यासाठी संघर्ष करत होते.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल -
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे, की रशियाचे राष्ट्रपती पुतिन हे पोडियम जवळ उभे राहून भाषण देत आहेत आणि यावेळी त्यांचे पाय हालत आहेत. सोशल मीडियावरील या पोस्टनुसार, हे एक भयंकर दृष्य आहे. महत्वाचे म्हणजे, पुतिन यांना त्यांच्या डॉक्टरांनी अस्थिर प्रकृतीमुळे अधिक वेळ सार्वजनिक कार्यक्रमांत भाग न घेण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, तरीही पुतिन सार्वजनिक कार्यक्रमात दुसून येतात.
Putin’s legs shaking, he looks unsteady on his feet, fueling more speculation about his health. Video was taken Sunday. pic.twitter.com/TIVfK30tAp
— Mike Sington (@MikeSington) June 14, 2022
खरे तर, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांची प्रकृती जगासाठी नेहमीच चर्चेचा विषय असते. तसेच जेव्हापासून युक्रेन युद्ध सुरू झाले आहे, तेव्हापासून तर ते गंभीर आजारी असल्याच्या अफवाही पसरत आहेत.
पुतिन यांच्यासंदर्भात करण्यात आला आहे असा दावा -
फॉक्स न्यूजने मंगळवारी दिलेल्या एका वृत्तानुसार, पुतीन यांचा एक विशेष सहकारी, पुतिन परराष्ट्र दौऱ्यावर असताना त्यांचे मल-मूत्र एकत्र करतो आणि ते नष्ट करण्यासाठी मास्कोला आणतो. असे करण्या मागे, पुतिन यांच्या प्रकृतीसंदर्भातील अधिक माहिती समोर येऊ नये, हा उद्देश आहे.