"पुतिन यांनी युक्रेनला 'टेस्टिंग ग्राउंड' बनवलं", रशियन मिसाइल हल्ल्यावरून झेलेन्स्की भडकले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2024 07:46 PM2024-11-21T19:46:12+5:302024-11-21T19:49:14+5:30
दरम्यान, अमेरिकन राष्ट्रपती ज्यो बायडेन यांच्याकडून फ्री हँड दिळाल्यानंतर, युक्रेनने अमेरिकेकडून मिळालेले लांब पल्ल्याचे मिसाइल नुकतेच रशियान भागात डागले होते. आता रशियाने या हल्ल्याचा बदला घेतला आहे.
युक्रेनच्या हवाई हल्ल्यांना रशियानेही मिसाइल हल्ला करत थेट प्रत्युत्तर दिले आहे. रशियाने 21 नोव्हेंबरला पहाटे 5 ते 7 वाजण्याच्य सुमारास युक्रेनच्या Dnipro शहरावर ICBM मिसाइल्सच्या माध्यमाने जबरदस्त हल्ला केला.
दरम्यान, अमेरिकन राष्ट्रपती ज्यो बायडेन यांच्याकडून फ्री हँड दिळाल्यानंतर, युक्रेनने अमेरिकेकडून मिळालेले लांब पल्ल्याचे मिसाइल नुकतेच रशियान भागात डागले होते. आता रशियाने या हल्ल्याचा बदला घेतला आहे. रशियाने युक्रेनच्या भागांत हल्ला करण्यासाठी RS-26 Rubezh मिसाइल्सचा वापर केला आहे. जी अस्त्राखान भागातून डागण्यात आली होती.
'रशियाने तो घाबरला असल्याचे दाखवून दिले' -
आता या हल्ल्यावर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांची प्रतिक्रिया आली आहे. झेलेन्स्की म्हणाले, "रशिया युक्रेनचा वापर 'टेस्टिंग ग्राउंड' म्हणून करत आहे. 21 नोव्हेंबर रोजी युक्रेन सन्मान आणि स्वातंत्र्य दिन साजरा करतो. युक्रेनच्या दोन क्रांतीची आठवण ठेवण्याचा आणि जनतेचा सन्मान करण्याचा हा दिवस आहे. मात्र, यातच आपला शेजारी पुन्हा एकदा त्याची खरी ओळख दाखवत आहे. या हल्ल्यातून रशियाने तो किती घाबरला आहे, हे दाखवून दिले आहे."
या मिसाइल्सने करण्यात आला हल्ला -
महत्वाचे म्हणजे, या युद्धात प्रथमच आंतरखंडीय क्षेपणास्त्राचा वापर करण्यात आला. यासाठी रशियाने आरएस-26 रुबेझ क्षेपणास्त्रे वापरली असण्याची शक्यता आहे, जी अस्त्रखान भागातून डागण्यात आली. युक्रेनच्या हवाई दलाने या हल्ल्याला दुजोरा दिला आहे.
या मिसाइलशिवाय, किंझल हायपरसोनिक आणि KH-101 क्रूझ क्षेपणास्त्रांनीही हल्ला करण्यात आला. तसेच, युक्रेनियन हवाई दलाने पुष्टी केली आहे की, या हल्ल्यात युक्रेनच्या महत्त्वाच्या संस्था, इमारतींचे नुकसान झाले आहे. या हल्ल्यात रशियाने क्रूझ मिसाइल्स डागण्यासाठी आपल्या लांब पल्ल्याच्या बॉम्बर Tu-95MS चा वापर केला आहे.