मॉस्को : भारताने आपल्या महान हिंदू सभ्यतेची पुनर्स्थापना करने आवश्यक आहे. कारण, वैदिक सभ्यतेची संकल्पना सर्वसमावेशक आहे आणि हिच्या पुनर्स्थापनेनेच बहुध्रुवीय विश्वाच्या स्थापनेस मदत मिळेल, असे रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचे राजकीय गुरु, रशियन राजकीय विचारवंत तथा तत्त्वज्ञ अलेक्झॅन्डर दुगिन यांनी म्हटले आहे. ते रशियातील सरकारी मीडिया रशिया टीव्ही (आरटी) सोबत बोलत होते.
महत्वाचे म्हणजे, रशिया देखील अमेरिकेच्या विरोधात बहुध्रुवीय व्यवस्थेचे समर्थन करत असतो. यामुळे अमेरिकेच्या प्रभुत्वाल धक्का बसण्याची शक्यता आहे.
या वर्षाच्या एप्रिल महिन्यात अलेक्झॅन्डर दुगिन यांनी अखंड भारतासंदर्भात आपले विचार मांडले होते. त्यांनी आपल्या या लेखात भारताच्या उदयासंदर्भात रशिया काय विचार करतो हे प्रकट केले होते. तसेच, भारत आपल्या डोळ्यांसमोर एक नवीन जागतिक केंद्र म्हणून उदयास येत आहे, असेही दुगिन यांनी म्हटले होते. याशिवाय, त्यांनी आपल्या लेखातून भारतीय अर्थव्यवस्थेच्या तेजीसंदर्भातही आनंद व्यक्त केला आहे.
दुगिन म्हणाले होते, आज भारतीय वंशाचे लोक संपूर्ण जगात मोठी भूमिका पार पाडत आहेत, असेही दुगिन यांनी लिहिले आहे. महत्वाचे म्हणजे, पश्चिमेकडील देशांमध्ये अलेक्झांडर दुगिन यांना रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचे गुरू मानले जाते. अलेक्झांडर दुगिन यांचे पूर्ण नाव अलेक्सांद्र गेलीविच दुगिन असे आहे. दुगिन फॅसिस्ट विचारधारेचे कट्टर समर्थक आहेत, असा आरोपही पश्चिमेकडील देशांकडून केला जातो.