Putin Ukraine War: सोव्हिएत संघाचे पतन झाले तेव्हा वॉशिंग मशीन घेऊन पळालेले पुतीन, आज हल्ला केला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 02:58 PM2022-02-25T14:58:14+5:302022-02-25T14:58:41+5:30

Russia-Ukraine War: पुतीन हे तेव्हा केजीबीचे गुप्तहेर होते. पुतीन यांच्यात गेल्या तीस वर्षांपासून ही आग धगधगत होती. त्याचीच परिणती आज झाल्याचे बोलले जात आहे.

Putin Ukraine War: Putin fled with a old washing machine when the Soviet Union collapsed | Putin Ukraine War: सोव्हिएत संघाचे पतन झाले तेव्हा वॉशिंग मशीन घेऊन पळालेले पुतीन, आज हल्ला केला

Putin Ukraine War: सोव्हिएत संघाचे पतन झाले तेव्हा वॉशिंग मशीन घेऊन पळालेले पुतीन, आज हल्ला केला

googlenewsNext

मास्‍को : अमेरिका आणि नाटोने युक्रेनला एकटे सोडले, रशिया सारख्य़ा बलाढ्य देशाविरोधात लढण्यास सांगितले, मदत करतो म्हणाले, असा गंभीर आरोप युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी केला आहे. आज युक्रेन जवळपास हरण्याच्या मार्गावर आहे. रशियाच्या सैन्याने युक्रेनची राजधानी कीवला घेरले आहे. कोणत्याही क्षणी ते कीववर ताबा मिळवू शकतात, असे ते म्हणाले. याच युक्रेनमुळे एकेकाळी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन पळाले होते. 

पुतीन हे तेव्हा केजीबीचे गुप्तहेर होते. पुतीन यांच्यात गेल्या तीस वर्षांपासून ही आग धगधगत होती. त्याचीच परिणती आज झाल्याचे बोलले जात आहे. पुतीन यांनी पूर्व जर्मनीतून २० वर्षे जुनी वॉशिंगमशीन घेऊन रशियाच्या लेनिनग्राड येथे आले होते. तेव्हा पासून त्यांच्या मनात बदल्याची आग धगधगत होती. पुतीन यांनी सोव्हिएत संघाच्या विघटनाला २० व्या शतकातील सर्वात मोठी भूराजनितीक संकट अशी उपमा दिली होती. 

पुतिन हे त्यांचे आई-वडील व्लादिमीर आणि मारिया पुतीन यांचे एकुलते एक अपत्य होते. त्याचे वडील कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य होते आणि एका कंपनीत फोनमन म्हणून काम करत होते. मारिया त्या वेळी लॅब क्लिनर होती. नाझी सैन्याने लेनिनग्राडवर कब्जा केला तेव्हा ती वाचली. पुतिन यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिले आहे की, 'एकदा मी भुकेने बेशुद्ध पडलो. लोकांना वाटले की ती मेली आहे आणि त्यांनी माझ्या आईला मृतदेहांमध्ये टाकले आहे. पुतीन यांना आणखी दोन भाऊही होते पण ते बालपणातच मरण पावले.

पुतिन 2015 मध्ये म्हणाले होते, 'मी 50 वर्षांपूर्वी लेनिनग्राडच्या रस्त्यावर धडा शिकलो, जर संघर्ष अटळ असेल, तर तुम्ही प्रथम ठोसा मारला पाहिजे.' कदाचित पुतिन आता हाच नियम युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी वापरत आहेत. 

Web Title: Putin Ukraine War: Putin fled with a old washing machine when the Soviet Union collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.