शहरं
Join us  
Trending Stories
1
Agniveer: "शहीदाच्या कुटुंबाला पैसे मिळत नाहीत"! राहुल गांधींच्या दाव्यावर काय म्हणाले अग्निवीर अक्षय गवते यांचे वडील?
2
'पंतप्रधान नरेद्र मोदी यांना अयोध्येतून निवडणूक लढवायची होती, पण...'; राहुल गांधींचा लोकसभेत मोठा गौप्यस्फोट?
3
VIDEO : राहुल गांधी यांनी भगवान शिव शंकरांचा फोटो दाखवताच कॅमेरा फिरला! काँग्रेस म्हणाली, बघा 'जादू'!
4
UPSC प्रीलिम्स 2024 परीक्षेचा निकाल जाहीर; मेन्सची तारीख पाहा...
5
पंकजा मुंडेंना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6
कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात निरंजन डावखरे 1 लाख 719 मते मिळवून विजयी
7
मेधा पाटकरांना 5 महिने कारावास अन् 10 लाखांचा दंड, 23 वर्षे जुन्या प्रकरणात शिक्षा
8
विधानपरिषदेत शिवीगाळ! अंबादास दानवे आणि प्रसाद लाड यांच्यात हमरीतुमरी; माझ्यावर बोट केलं, तर....
9
विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी 
10
पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी; मनोज जरांगेंची स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले...
11
'सिंचन घोटाळ्यातील आरोपी भाजपसोबत', AAP खासदाराच्या टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार
12
राजस्थानमध्ये भीषण अपघात! बोलेरो-ट्रकची धडक; ९ जणांचा मृत्यू
13
“गर्व है कि हम हिंदू हैं!”; राहुल गांधी यांच्या विधानावरुन योगी आदित्यनाथ यांचे प्रत्युत्तर
14
“उद्धव ठाकरेंच्या काळात महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला, २ वर्षांत FDIमध्ये अव्वल”: उदय सामंत 
15
"मला गप्प बसवायला गेले अन् भाजपच्या ६३ खासदारांना जनतेने कायमस्वरुपी बसवलं", महुआ मोईत्रांचा हल्लाबोल
16
"माझा भाऊ कधीच हिंदूंचा अपमान करू शकत नाही’’, राहुल गांधींच्या बचावासाठी प्रियंका गांधी सरसावल्या  
17
'लिहून देतो, तुमचा गुजरातमध्ये पराभव करणार...', लोकसभेतून राहुल गांधींचे BJP ला थेट आव्हान
18
“खऱ्या अर्थाने वंचित, दलितांना न्याय देण्याचे काम भाजपा करते”; अमित गोरखेंची प्रतिक्रिया
19
Maharashtra Vidhan Parishad Election 2024 विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवार जाहीर, पंकजा मुंडेंसह या पाच जणांना संधी
20
शेकडो कर्मचाऱ्यांसाठी रतन टाटा बनले संकटमोचक; नोकरीवरुन काढण्याची नोटीस घेतली मागे

पुतिन यांची सुपरकार...! ६ सेकंदांत गाठते १०० किमी वेग; बॉम्ब आणि बुलेटचाही होत नाही परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 1:12 PM

आता पुन्हा एकदा पुतीन यांच्या ऑरस सीनेट कारचीही चर्चा सुरू झाली आहे. ही रशियन राष्ट्रपतींची आधिकृत कार आहे...

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन उत्तर कोरियाचा दौरा पूर्ण करू आता व्हिएतनामला पोहोचले आहेत. त्यांचा, उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनसोबतचा एका कारमधील फटो सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. या दोन्ही नेत्यांनी बुधवारी रशियामध्ये तयार झालेल्या ऑरस लिमोझिनमधून (Aurus Limousine ) फेरफटका मारण्याचा आनंद घेतला.

यातच, आता पुन्हा एकदा पुतीन यांच्या ऑरस सीनेट कारचीही चर्चा सुरू झाली आहे. ही रशियन राष्ट्रपतींची आधिकृत कार आहे. ही कार सोव्हियत काळातील ZIL लिमोझिनची रेट्रो-स्टाइल कार आहे. या कारने मर्सिडीज-बेंझ एस ६०० गार्ड पुलमनची जागा घेतली होती. गेल्या मे महिन्यात क्रेमलिन उद्घाटन समारंभावेळी पुतिन ऑरस सिनेटनेच गेले होते. 

रूशियामधील NAMI ने 'कोर्तेज' प्रोजेक्टचा एक भाग म्हणून ऑरस सीनेट डेव्हलप केली आहे. सेंट्रल सायंटिफिक रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ ऑटोमोबाईल्स अँड ऑटोमोटिव्ह इंजिन्स - NAMI ही एक वैज्ञानिक संस्था आहे जी रशियातील ऑटोमोटिव्ह उद्योग विकासाच्या क्षेत्रात कार्यरत आहे.

ऑरस सीनेटची खासियत - या कारमध्ये एका राष्ट्रपतीच्या वाहनात आवश्यक असलेल्या सर्व सुविधा आहेत. महत्वाचे म्हणजे, या कारमध्ये सुरक्षितता आणि कम्युनिकेशनसंदर्भातील आश्चर्य चकित करणारे फीचर्स आहेत. ही कार पूर्णपणे बुलेटप्रूफ असल्याचे, तसेच या कारवर बॉम्बचाही काही परिणाम होत नसल्याचे बोलले जाते. मात्र, असे असले तरी, या कारसंदर्भात फारशी माहिती कधीही समोर आलेली नाही. या कारमध्ये ४.४-लीटर ट्विन-टर्बो V८ चा वापर करण्यात आला आहे. जे ५९०bhp तयार करते. विशेष म्हणजे, ही कार ताशी ०-१०० किमी एवढा वेग केवळ सहा सेकंदांतच धारण करू शकते. तसेच हिचा जास्तीत जास्त वेग ताशी २४९ किमी एवढा आहे.

परदेश दौऱ्यावर असतानाही पुतीन यांच्यासोबत असते ही कार -राष्ट्रपती पुतीन परदेश दौऱ्यावरही आपली ही कार सोबत ठेवतात. इलुशिन IL-७६ वाहतूक विमानाने ही कार त्यांच्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचवली जाते. 

टॅग्स :Vladimir Putinव्लादिमीर पुतिनKim Jong Unकिम जोंग उनrussiaरशियाcarकार