शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
2
Susie Wiles : कोण आहेत सूझी विल्स? ज्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी बनवलं व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ
3
निवडणुकीत अल्पसंख्याक मतदारांची भूमिका महत्त्वाची, राज्यातील ३५ जागांवर ठरणार निर्णायक
4
US Fed Rate Cut : अमेरिकेत पुन्हा व्याजदरात कपात; फेडनं ०.२५ टक्के कमी केला रेट, शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
5
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
6
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
7
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
8
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
9
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
10
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
11
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
12
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
13
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
14
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
15
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
16
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
17
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
19
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
20
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'

आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 8:59 PM

Qatar Airways Turbulence: या घटने 6 क्रू-मेंबर्ससह 6 प्रवासी जखमी झाले आहेत.

Qatar Airways Turbulence: कतारची राजधानी दोहा येथून आयर्लंडला जाणाऱ्या कतार एअरवेजच्या विमान टर्ब्युलन्समध्ये अडकले. यामुळे विमानातील किमान 12 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये सहा क्रू मेंबर्सचाही समावेश आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, कतार एअरवेजचे विमान QR017(बोईंग 787 ड्रीमलाइनर) तुर्कस्तानवरुन जात असताना अचानक टर्ब्युलन्समध्ये अडकले. पण अखेर पायलटने दुपारी 1 च्या सुमारास विमानतळावर विमानाची सुखरुप लँडिंग केल. लँडिंग होताच पोलिस आणि अग्निशमन दलासह बचाव पथकाने विमानाकडे धाव घेतली. या घटनेत सहा प्रवासी आणि सहा कर्मचारी (एकूण 12) जखमी झाले आहेत.

यापूर्वी घडली अशीच घटना अलीकडेच लंडनहून सिंगापूरला जाणाऱ्या सिंगापूर एअरलाइन्सचे विमानदेखील टर्ब्युलन्समध्ये अडकले होते. अवघ्या पाच मिनिटांत विमान 6000 फूट खाली आले. या घटनेत एका 73 वर्षीय ब्रिटीश व्यक्तीचा मृत्यू झाला, तर 20 जण जखमी झाले होते. टर्ब्युलन्सनंतर विमानाची बँकॉकमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आली आणि तातडीने जखमींना रुग्णालयात दाखल केले.

टॅग्स :airplaneविमानAirportविमानतळAccidentअपघातInternationalआंतरराष्ट्रीय