जकार्ता : इंडोनेशियाच्या सुलावेसी बेटावर शुक्रवारी (28 सप्टेंबर) 7.5 रिश्टर स्केलचा भुकंपाचा धक्का बसल्यानंतर काही वेळाने त्सुनामीचाही जोरदार फटका बसला आहे. इंडोनेशियाच्या जिओफिजिक्स खात्याने याबाबत माहिती दिली होती. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एएफपी या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे.
जिओफिजिक्स खात्याचे प्रवक्त्याने त्सुनामी आल्याचे सांगितले. 7.5 रिश्टर स्केलच्या भुकंपानंतर समुद्र किनाऱ्यांवर मोठ्या लाटा उसळल्या आहेत. मात्र, याबाबत माहिती घेत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.