शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
2
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
3
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
4
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
5
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
6
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
7
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
8
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
9
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
11
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
12
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
13
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
14
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
16
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
17
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
18
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
19
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
20
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...

Rafale Deal : राफेल व्यवहारात भारतीय मध्यस्थीला कोट्यवधींचं 'गिफ्ट'; फ्रेन्च रिपोर्टचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2021 10:22 AM

Rafale Deal : दसॉच्या खात्यांच्या ऑडिटनंतर ही बाब समोर आल्याचा फ्रेन्च रिपोर्टचा दावा. फ्रान्सच्या अँटी करप्शन एजन्सीनं केलं ऑडिट

ठळक मुद्देदसॉच्या खात्यांच्या ऑडिटनंतर ही बाब समोर आल्याचा फ्रेन्च रिपोर्टचा दावा.फ्रान्सच्या अँटी करप्शन एजन्सीनं केलं ऑडिट

भारत-फ्रान्सदरम्यान राफेल लढाऊ विमानाच्या व्यवहारामधील भ्रष्टाचाराचे आरोप पुन्हा एकदा बाहेर आले आहे. फ्रान्स पब्लिकेशननं राफेल तयार करणाऱ्या फ्रान्सच्या कंपनी दसॉनं भारतातील एका मध्यस्थाला गिफ्ट म्हणून एक दशलक्ष युरो दिले होते असा दावा केला आहे. फ्रान्समधील माध्यमाच्या या गौप्यस्फोटानंतर पुन्हा एकदा राफेल व्यवहाराबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ लागलं आहे. २०१६ मध्ये जेव्हा भारत आणि फ्रान्सदरम्यान राफेल लढाऊ विमानांबाबत हा व्यवहार झाला त्यावेळी दसॉ या कंपनीनं भारतातील एका मध्यस्थीला ही रक्कम दिली होती. २०१७ मध्ये दसॉ ग्रुपच्या अकाऊंटमधून ५०८९२५ युरो 'गिफ्ट 'टू क्लायंट' या नावानं ट्रान्सफर करण्यात आले होते असा दावा फ्रान्समधील पब्लिकेशन 'मीडियापार्ट'नं आपल्या रिपोर्टमध्ये केला आहे. फ्रान्सच्या अँटी करप्शन एजन्सी AFA नं दसॉच्या खात्यांचं ऑडिट केलं. त्यावेळी ही बाब समोर आली. मीडियापार्टच्या रिपोर्टनुसार हा खुलासा झाल्यानंतर दसॉनं याबद्दल स्पष्टीकरण दिलं. तसंच या पैशांचा वापर राफेल लढाऊ विमानाचे ५० मोठे मॉडेल तयार करण्यासाठी झाला होता. परंतु अशी कोणती मॉडेल तयारच झाली नाही, असं त्यांनी सांगितलं. ऑडिटमध्ये ही बाब समोर आल्यानंतरही एजन्सीनं कोणतीही कारवाई केली नाही. हे फ्रान्समधील न्यायिक प्रक्रिया आणि राजकारणी एकत्र असल्याचं दाखवून देत असल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. फ्रान्समध्ये २०१८ साली एक एजन्सी Parquet National Financier (PNF) नं या डीलमध्ये घोटाळा झाल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर हे ऑडिट करवण्यात आलं. त्या ऑडिटनंतर ही बाब समोर आली होती. प्रश्नांचं उत्तरच नाहीदरम्यान, दसॉ समुहानं गिफ्ट म्हणून दिलेल्या रकमेचा बचाव केला आहे. भारतीय कंपनी Defsys Solutions च्या एका इन्व्हॉईसवरून दाखण्यात आलं की जे ५० मॉडेल्स तयार करण्यात आले आहेत त्याचीच अर्धी रक्कम त्यांना देण्यात आली. प्रत्येक मॉडेलची किंमत जवळपास २० हजार युरो इतकी होती, असंही रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. परंतु सर्व आरोपांसाठी दसॉकडे कोणतंही उत्तर नव्हतं. तसंच ही गिफ्ट केलेली रक्कम कोणाला आणि का दिली हेदेखील कंपनी सांगू शकली नाही. ज्या भारतीय कंपनीचं यात नाव घेण्यात आलं आहे ती यापूर्वीही वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. या कंपनीचा मालक ऑगस्टा वेस्टलँड केसमध्ये तुरुंगातही जाऊन आले आहेत, असा दावा या रिपोर्टमधून करण्यात आला आहे. 

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलFranceफ्रान्सIndiaभारतMONEYपैसा