नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी दोन दिवसांच्या दुबई दौऱ्यावर आहोत. दुबईतमधील विमानतळावर मोठ्या उत्साहात राहुल गांधी यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी विमानतळावर उपस्थितांनी 'राहुल-राहुल' अशी घोषणाबाजी केली.
दुबई आणि अबु धाबीमधील दौऱ्यात राहुल गांधी येथील भारतीय समुदायाला संबोधित करणार आहेत. तसेच, येथील विद्यार्थी आणि उद्योगपतींशी चर्चा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. राहुल गांधी यांचा या वर्षातील पहिलाच हा विदेश दौरा आहे. त्यांच्यासोबत, सॅम पित्रोदा आणि केरळचे माजी मुख्यमंत्री ओमान चांडी सुद्धा दुबईत आहेत.
दरम्यान, काँग्रेसकडून राहुल गांधी यांचा दुबई दौरा राजकीय नसल्याचे सांगण्यात येत आहे. दुबईमध्ये असणाऱ्या भारतीयांना येणाऱ्या अडचणी राहुल गांधी या दौऱ्यात ऐकून येणार आहेत. तसेच, येथील भारतीयांच्या समस्या संसदेत मांडणार आहेत.