इस्लामाबाद - अनेक कार्यालयातील कर्मचारी आपल्या वरिष्ठांना वैतागलेले असतात. अगदी सरकारी कार्यालयेही याला अपवाद नाही. त्यात मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये होणारी खडाखडी तर नेहमीचीच. मात्र रेल्वेमंत्र्यांच्या कार्यपद्धतीला वैतागलेल्या एका अधिकाऱ्याने चक्क 730 दिवसांच्या भरपगारी रजेसाठी अर्ज केला आहे. या अधिकाऱ्याच्या रजेचा अर्ज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.हा प्रकार पाकिस्तानमधील असून, नवे रेल्वेमंत्री शेख रशिद अहमद यांच्यासोबत काम करणे अशक्य असल्याचे सांगत कर्मचारी हनिफ गुल या अधिकाऱ्याने मंत्रालयाच्या सचिवांकडे रजेसाठी अर्ज केला आहे. पाकिस्तानमधील जियो टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार हनिफ गुल हे पाकिस्तान रेल्वेमधील ग्रेड-20 अधिकारी आहेत.
रेल्वे मंत्र्यांना वैतागून अधिकाऱ्याने मागितली 730 दिवसांची रजा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 1:11 PM