पॅरिस : लग्न समारंभात पाऊस पडणे हे संकट वाटू शकते , अशा पाश्चिमात्य देशात सध्या एक नवी सेवा चालू झाली आहे. लग्न समारंभात पाऊस पडणे नको असे वाटत असेल , तर एक लाख पौंड भरा आम्ही तुमच्या लग्नात पडणारा पाऊस रोखू असा लंडनमधील एका कंपनीचा दावा आहे. आॅलिव्हर ट्रॅव्हल्स असे या कंपनीचे नाव असून फ्रान्समध्ये काही ठिकाणी सेवा देण्याची या कंपनीची तयारी आहे. तसेच मागणी असेल तर लंडन शहरातही हेच काम करण्याचा त्यांचा मानस आहे. ही सर्व प्रक्रिया तीन आठवड्यांची आहे. विमान मिळण्यासाठी एक आठवडा, हवामानतज्ज्ञ व वैमानिक यांना फ्रान्समधून बोलावणे, विमानातील कर्मचारी लग्न समारंभाआधी एक आठवडा उपलब्ध असावे लागतात. क्लाऊड सीडिंग हा या प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. पाऊस व बर्फवृष्टीसाठी हा घटक वापरला जातो. चीनमध्ये बिजींग आॅलिम्पिकच्या काळात शुभारंभाचा कार्यक्रम बिघडू नये म्हणून या पद्धतीने पाऊस रोखण्यात आला. ही पद्धतच नव्या कंपनीने लग्न समारंभात पाऊस रोखण्यासाठी वापरली आहे. या पद्धतीने पाऊस रोखण्यात यश मिळते, पण वादळच आले तर मात्र कोणाचेच काही चालू शकत नाही, असे कंपनीने म्हटले आहे. प्रसिद्ध विमानतळापासून ३० कि.मी.च्या अंतरापर्यंत ही कंपनी सेवा देऊ शकते. (वृत्तसंस्था)४नव्या तंत्रज्ञानानुसार पाऊस पडणाऱ्या ढगावर सिल्व्हर आयोडाईडचा मारा केला जातो, यामुळे ढगातील पाण्याचे कण एकत्रित येतात व पाऊस पडून जातो. लग्नाच्या आधी तीन आठवड्यांपासून हे नियोजन केले जाते. ४कंपनीचे हवामान तज्ज्ञ व वैमानिक मिळून लग्नाआधीच इतका पाऊस पाडला जातो की लग्नाच्या तारखेला आकाश कोरडे राहते. त्यामुळे सोहळ्याचा विचका टळतो.
१ लाख पौंडात मांडवावरील पाऊस रोखा!
By admin | Published: February 06, 2015 2:29 AM