शहरं
Join us  
Trending Stories
1
“इथले मीठ खाता अन् मराठीला विरोध करता? हिंदीची सक्ती होऊ देणार नाही”; उद्धव ठाकरेंनी ठणकावले
2
दुहेरी हत्याकांडाने छत्रपती संभाजीनगर हादरलं; दुचाकीच्या वादातून दोघांची दगडाने ठेचून हत्या
3
हे साफ खोटं, ही FAKE NEWS आहे...; 'डिंपल गर्ल' प्रिती झिंटा असं का म्हणाली? प्रकरण काय
4
३ तास समजावल्यानंतरही, सासूचे मत बदलले नाही, होणाऱ्या जावयाकडेच राहणार; मुलीच्या लग्नाआधी झाली होती फरार
5
IPO आणण्याच्या तयारीत PhonePe, नावही बदललं; भारतात लिस्टिंगच्या तयारीला वेग
6
“...म्हणून त्यांनी माझे सरकार पाडले”; उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले, सांगितली Inside Story
7
सगळी भांडणं मिटवतो, पण आधी शपथ घ्या की...; 'मनसे' युतीसाठी उद्धव ठाकरेंनी बंधूंसमोर ठेवली एक अट!
8
ठाकरे बंधू एकत्र येणार?; आमच्या वादापेक्षा महाराष्ट्र मोठा असल्याचं सांगत राज ठाकरेंकडून युतीसाठी टाळी!
9
सुप्रसिद्ध अभिनेत्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारत झालेला फरार, नेमकं प्रकरण काय?
10
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना गती; शिंदे गटातील नेत्यांची प्रतिक्रिया म्हणाले...
11
तमन्ना भाटियासारखं फिट आणि सुंदर दिसायचंय? अभिनेत्रीने सांगितलेला सीक्रेट डाएट प्लान करा फॉलो
12
Anaya Bangar Boy to Girl Transition Story: संजय बांगरचा मुलगा का बनली मुलगी? 'ट्रान्सजेंडर' Anaya Bangar ने सगळंच सांगून टाकलं...
13
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ 'या' दिवशी ६ तासांसाठी बंद राहणार!
14
FD vs SIP: कोणता पर्याय ठरू शकतो बेस्ट, फायदा-तोट्याचं गणित समजून घ्या
15
“मराठीला हिंदी नाही तर गुजरातीपासून सर्वाधिक धोका”; संजय राऊतांची मनसे, भाजपावर टीका
16
Tarot Card: सुरवंटाचे फुलपाखरू होण्याचा काळ, प्रयत्नात कुचराई नको; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
कोट्याधीश करणारा वसुमती योग: ८ राशींना शुभ, उत्पन्न वाढेल; हाती पैसा राहील, लाभच लाभ होतील!
18
Maharashtra Politics : इंग्रजीला पालख्या आणि हिंदीला विरोध? हे कसं चालतं ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सवाल
19
प्रेमाचा जांगडगुत्ता! मुलीच्या सासऱ्यासोबतच ममता झाली फरार; महिलेच्या पतीला दुःख अनावर
20
५ वर्षांपूर्वी मृत्यू झालेला 'तो' रिक्षा चालवताना सापडला; पत्नीशी WhatsApp वर चॅटिंग, अखेर...

पाऊण पृथ्वीवर पाऊस अस्थिर; जागतिक हवामान बदलांमुळेच अचानक अतिवृष्टी अन् भीषण दुष्काळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 10:01 IST

ताज्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. 

सिडनी : गेल्या शतकात मानवी हस्तक्षेपामुळे तापमान वाढून पृथ्वीच्या ७५ टक्क्यांहून अधिक क्षेत्रात पावसाची अस्थिरता वेगाने वाढली आहे, विशेषत: ऑस्ट्रेलिया, युरोप आणि ईशान्य अमेरिकेवर हा प्रभाव अधिक आहे. त्यामुळेच अचानक वादळी पाऊस, भीषण दुष्काळ, असे प्रकार अधिक वाढले आहेत, असे ताज्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. 

चिनी संशोधक आणि ब्रिटिश हवामान विभागाने केलेले यासंदर्भातील निष्कर्ष विज्ञान नियतकालिकात प्रकाशित झाले आहेत. हवामान बदल पावसाला अधिक अस्थिर करत आहेत आणि हा बदल आणखी वाढत जाईल, असा या शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. शास्त्रज्ञांनुसार  गेल्या १०० वर्षांमध्ये विशेषतः ऑस्ट्रेलियामध्ये पावसाची अस्थिरता अधिक वाढली आहे. चिंतेची बाब म्हणजे हवामान बदल चालू राहिल्याने ही समस्या आणखी बिकट होणार आहे. त्यामुळे दुष्काळ आणि पूर या दोन्हींचा धोका वाढतो. दैनंदिन पर्जन्यमानातील बदल जगभरात सर्व ऋुतुंमध्ये आढळल्याचे संशाेधकांनी अहवालात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

ग्लोबल वाॅर्मिंगचा पावसावर कसा परिणाम होतो?

संशोधकांचे निष्कर्ष समजून घेण्यासाठी, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की, कोणते घटक वादळ किती प्रचंड प्रमाणात पाऊस निर्माण करतात आणि जागतिक हवामान बदलांमुळे (ग्लोबल वॉर्मिंग) या घटकांवर कसा परिणाम होतो.

पहिला घटक म्हणजे हवेत पाण्याची वाफ किती आहे. उष्ण हवेत जास्त ओलावा असू शकतो. ग्लोबल वॉर्मिंगमुळे ठराविक क्षेत्रावरील पाण्याच्या बाष्पाचे प्रमाण सरासरी सात टक्क्यांनी वाढते.

शास्त्रज्ञांना या समस्येबद्दल कित्येक वर्षांपासून कल्पना आहे. औद्योगिक क्रांतीपासून पृथ्वीचे तापमान १.५ अंश सेल्सिअसने वाढले आहे. त्यामुळे पाण्याची वाफ होण्याचे प्रमाण १० टक्क्यांनी वाढले आहे. त्यातून वादळी पावसाचे प्रमाण वाढले आहे.

अभ्यासात काय आढळले?

संशोधनात दिसून आले आहे की, १९०० च्या दशकापासून पावसाच्या अस्थिरतेत पद्धतशीर वाढ झाली आहे. जागतिक स्तरावर पर्जन्यमानातील दैनंदिन परिवर्तनशीलता दर दशकात १.२ टक्क्यांनी वाढला आहे.

अस्थिरता वाढणे म्हणजे कालांतराने पावसाचे वितरण अधिक असमान होत जाते. ज्यामुळे कमी वेळेत एकतर अतिवृष्टी होते किंवा अत्यंत कमी पाऊस पडतो. याचा अर्थ असा की, दिलेल्या ठिकाणी वर्षभराचा पाऊस आता कमी दिवसांत पडतो. दीर्घकालीन दुष्काळात पूर येऊ शकतो, किंवा दुष्काळाची तीव्रता आणखी वाढू शकते. 

संशोधकांनी वर्ष १९०० पासून उपलब्ध असलेल्या माहितीचा सखाेल अभ्यास केल्यानंतर आढळले की, जमिनीच्या ७५ टक्क्यांहून अधिक भागांत पावसाची अस्थिरता वाढली आहे. युरोप, ऑस्ट्रेलिया आणि पूर्व उत्तर अमेरिका हे भूभाग विशेषतः प्रभावित झाले आहेत.

 

टॅग्स :floodपूर