मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने इंडस्ट्रीत जेव्हा पाऊल ठेवलं, त्यावेळी पार्नस्टार हा शब्दही तिच्या नावाशी जोडला गेला होता. सनीने आपल्या अभिनयाच्या आणि बॉलिवूडमध्ये निभावलेल्या वेगवेगळ्या भूमिकांच्या जोरावर स्व:ताची पॉर्नस्टार ही इमेज बदलून टाकली आहे. मात्र, सनीमुळे देशातील अनेकांना पार्न या शब्दाची ओळख झाली. तत्पूर्वी पॉर्न हा शब्द भारतात इतक्या प्रमाणात प्रचलित नव्हता. त्यातच, इंटरनेटच्या मायाजालामुळे हा शब्द गावखेड्यापर्यंत पोहोचला. मात्र, जगातील अनेक देशांमध्ये पॉर्न इंडस्ट्रीला मान्यता आहे. तर, युरोपीयन देशात जगातील पहिली पॉर्न युनिव्हर्सिटीही स्थापन करण्यात आली आहे.
सध्या राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणात नवीन खुलासे होत आहेत. यासह या प्रकरणात आणखी बरीच नावेही जोडली जात आहेत. मात्र, या प्रकरणामुळे देशात पुन्हा एकदा पॉर्न चर्चेत आलं आहे. मात्र, जगातील अनेक देशांमध्ये पॉर्न इंडस्ट्रीला मान्यता असून तेथे पॉर्नवर चर्चा केली जाते. जगात जेवढ्या प्रमाणात पॉर्न तयार केले जाते, त्यापेक्षा कित्येक पटीने ते पाहिले जाते. पॉर्न फिल्ममध्ये काम करण्यासाठी योग्य प्रशिक्षण देणारं एक विद्यापीठही युरोपीयन देशात आहे.
सिफरेदी हार्ड अकॅडमी
या विद्यापीठीत पॉर्नमध्ये काम कसे करावे ? त्यासाठी अभिनय कसा करावा ? याविषयी सगळी माहिती देण्यात येते. ही युनिव्हर्सिटी रोको सिफरेदी (Rocco Siffredi) चालवतात. या युनिव्हर्सिटीचे नाव सिफरेदी हार्ड अकॅडमी असं नाव आहे. मात्र सहा वर्षांपूर्वी 2015 मध्ये त्यांनी सिफरेदी हार्ड अकॅडमी नावाच्या विद्यापीठाची स्थापन करण्याची घोषणा केली होती. या विदयापीठामध्ये पॉर्नमध्ये काम करणाऱ्या तरुण-तरुणींना प्रशिक्षण दिले जाते. या विद्यापीठात दरवर्षी अनेक तरूण-तरूणी प्रवेश घेत असतात.
युरोपीयन देशातील हंरेगीमध्ये Csomor, Ret Street येथे रोको सिफरेदी यांची ही सिफरेदी हार्ड अकॅडमी नावाचं पॉर्न ट्रेनिंग विद्यापीठ आहे. रोको सिफरेदी यांनी जगातील पहिल्या पॉर्न विद्यापीठाची स्थापना केली. 2015 मध्ये ही युनिव्हर्सिटी स्थापन केल्यानंतर येथे अॅडमिशन घेण्यासाठी तरुण-तरुणींची झुंबड उडाली होती. या विद्यापीठात पॉर्नसंबधी सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. सिफरेदी हेही मोठे पॉर्नस्टार होते. त्यांनी आतापर्यंत 1600 पॉर्न फिल्ममध्ये काम केलेले आहे.
शर्लिन चोप्रा अन् पूनम मांडेला जामीन मंजूर
राज कुंद्रा प्रकरणात अभिनेत्री-मॉडेल शर्लिन चोप्रा हिला समन्स बजावले आहे. मंगळवारी सकाळी 11 वाजता पॉर्नोग्राफीप्रकरणी तिचा जबाब नोंदवण्यासाठी गुन्हे शाखेने शर्लिनला बोलावले होते. त्यानंतर गुन्हे शाखेच्या रडारवर असलेल्या मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे आणि शर्लिन चोप्रा यांनी अटक पूर्व जामिनासाठी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. आज मुंबई हायकोर्टाने या दोघींना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.