काठमांडू:भारतासह शेजारी देश असलेल्या नेपाळमध्येही कोरोनाची परिस्थिती खूपच बिकट असल्याचे सांगितले जात आहे. नेपाळमध्ये कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून, ऑक्सिजन आणि अन्य संसाधनांचा प्रचंड तुडवडा असल्याचे सांगितले जात आहे. ऑक्सिजनअभावी शेकडो जणांचा दररोज मृत्यू होत असल्याची माहिती मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांचे परराष्ट्र सल्लागार रंजन भट्टराय यांनी भारताकडून मदतीची मोठी अपेक्षा असल्याचे म्हटले आहे. (rajan bhattarai says we expect medical help from india during corona situation in nepal)
नेपाळमध्ये कोरोना रुग्णांसाठी लागणाऱ्या ऑक्सिजनचाही मोठा तुटवडा जाणवू लागला आहे. अशात पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांना भारताकडून मदतीची अपेक्षा आहे. या कठीण काळात भारताने त्यांची मदत करावी. ओली यांची मैत्री तर चीनसोबत आहे, मात्र मदतीची अपेक्षा ते भारताकडून करत आहेत, असे सांगितले जात आहे.
कठीण काळात भारताने मदत करावी
नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांचे परराष्ट्र सल्लागार रंजन भट्टाराय यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की, नेपाळला भारताकडून मदतीची अपेक्षा आहे. भारताने त्यांना या कठीण काळात ऑक्सिजन, आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटरचा पुरवठा करावा. कोरोनापासून बचावासाठी लागणारं सर्वात मोठं शस्त्र म्हणजेच लिक्विट ऑक्सिजन त्यांच्याकडे नाही. नेपाळमध्ये ऑक्सिजनच्या तुटवड्याने तेथील नागरिकांची चिंता वाढली आहे. ऑक्सिजनची मागणी दसपटीने वाढली असून, आम्ही भारत सरकारसोबत चर्चा करत असल्याचे भट्टाराय यांनी सांगितले.
योगी आदित्यनाथ मैदानात; १० दिवसांत ११ ठिकाणी दौरे, परिस्थितीचा घेतला आढावा
चीनकडून मदतीचा हात
के. पी. शर्मा ओली यांची चीनशी फार जवळीक असल्याचे गेल्या काही महिन्यांपासून दिसून येत आहे. ओली यांचे चीनशी सलोख्याचे संबंध आहेत. सध्या चीन नेपाळला कोरोनाविरोधातील लढ्यासाठी औषधे आणि लसींचा पुरवठा करत आहे. अलीकडेच चीनकडून नेपाळला १८ हजार ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, भारताकडूनही काही प्रमाणात मदत केली जात आहे. सीरमच्या कोव्हिशिल्डचे १० लाख कोरोना लसींचे डोस नेपाळला देण्यात आले आहेत. नेपाळमध्ये दिवसेंदिवस कोरोनाची परिस्थिती गंभीर होताना दिसत आहे. नेपाळमध्ये दररोज ८ हजारांहून अधिक नवे रुग्ण समोर येत असून, १५० ते २०० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. अलीकडेच चीनने नेपाळला कोरोना लसीचे ८ लाख डोस मदत म्हणून दिले आहेत.