लंडन : भारतात जन्मलेले आणि कष्टांनी लक्षाधीश बनलेले राजेश अग्रवाल (३९) लंडनचे उपमहापौर झाले आहेत. सादिक खान हे महापौर आहेत. लंडन शहराचा बुद्धिमत्तेकडे आणि साहसी उपक्रमांकडे बघण्याचा खुलेपणा सार्वमतामुळे बदलून जायला नको, असे अग्रवाल म्हणाले. भारतात सामान्य वातावरणात वाढलेले राजेश अग्रवाल यांनी स्थापन केलेल्या रॅशनलएफएक्स या विदेशी चलन व्यवहारांतील प्रचंड मोठ्या कंपनीची गेल्या वर्षीची वार्षिक उलाढाल १.३ अब्ज पौंडांची होती. (वृत्तसंस्था)
राजेश अग्रवाल लंडनचे उपमहापौर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2016 5:38 AM