शहरं
Join us  
Trending Stories
1
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
2
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
3
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
4
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
5
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
6
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
7
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
8
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
9
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
10
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ
11
माझा पुढचा जन्म 'या' राज्यातच व्हावा, अशी माझी इच्छा आहे; धीरेंद्र शास्त्री यांचं विधान
12
"लेबनानमधील पेजर हल्ला हा इस्रायलचा 'मास्टरस्ट्रोक', भारतात जर असा प्रयत्न झाला तर..."
13
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 
14
तिरुपती लाडू भेसळ प्रकरणाचा तपास एसआयटीकडून स्थगित, सांगितलं 'हे' कारण...
15
विराट कोहलीपेक्षा अब्दुला शफीकचा रेकॉर्ड चांगला आहे; पाकिस्तानच्या कर्णधाराचा दावा
16
"अंबानींच्या लग्नावर करोडोंचा खर्च, पण शेतकरी...", राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
सासूच्या मृत्यूची बातमी, तरीही सेटवर हसत होती 'ही' अभिनेत्री, नवऱ्याने असं केलं रिएक्ट
18
“भाजपासाठी महाराष्ट्र हे ATM, मोदी-शाह यांच्या दौऱ्याचा मविआलाच फायदा”; काँग्रेसची टीका
19
"विमानांप्रमाणे आता एसटीच्या ई- शिवनेरी बसमध्ये दिसणार शिवनेरी सुंदरी’’, भरत गोगावले यांची घोषणा
20
Irani Cup 2024 : मैं हूँ ना! मुंबईचा खडतर प्रवास; पण अजिंक्य रहाणेचा 'संयम', अय्यर-सर्फराजची चांगली साथ

VIDEO: शानदार! जबरदस्त!! झिंदाबाद!!! टाईम्स स्क्वेअरमध्ये जय श्रीराम; बिलबोर्ड झळकला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2020 8:32 PM

आज सकाळी अयोध्येत पंतप्रधान मोदींच्या हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन

न्यूयॉर्क: अमेरिकेतील टाईम्स स्क्वेअरमध्ये राम मंदिराचा डिजिटल बिलबोर्ड पाहायला मिळाला आहे. आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येत राम मंदिराचं भूमिपूजन संपन्न झालं. त्या पार्श्वभूमीवर न्यूयॉर्कमध्ये प्रसिद्ध टाईम्स स्क्वेअरमध्ये राम मंदिराचा डिजिटल बिलबोर्ड पाहायला मिळाला. अयोध्येत राम मंदिराचं भूमिपूजन झाल्यानंतर न्यूयॉर्कमधल्या प्रसिद्ध टाईम्स स्क्वेअर येथे प्रभ रामचंद्रांचं छायाचित्र झळकणार असल्याची चर्चा होती. मात्र टाईम्स स्क्वेअरमधील बिलबोर्ड्सवरील जाहिरातीचं काम सांभाळणाऱ्या कंपनीनं यास नकार दिला होता. अमेरिकेतल्या मुस्लिमांनी या प्रकरणात विरोध दर्शवत मोहीम हाती घेतल्यानं जाहिरात कंपनीनं प्रभू रामाचे फोटो झळकण्यास असमर्थतता दर्शवली. मात्र आज अचानक टाईम्स स्क्वेअरमध्ये प्रभू रामचंद्र, अयोध्येतील राम मंदिर आणि भारताचा झेंडा फडकला. ते पाहून तिथे उपस्थित असलेल्या भारतीयांना सुखद धक्का बसला.आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे. यावेळी त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल, सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते. या सोहळ्याला १७५ जण हजर होते. देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सोहळ्यासाठी अतिशय मोजक्या व्यक्तींना निमंत्रित करण्यात आलं आहे.अयोध्येत पंतप्रधान मोदींनी राम मंदिरासाठी भूमिपूजन केलं. त्यांनी एकूण ९ शिळांचं पूजन केलं. यावेळी कूर्म शिळा मध्यभागी ठेवण्यात आली होती. याच शिळेवर रामलला विराजमान होणार आहेत. जय श्रीराम आणि हर-हर महादेवच्या जयघोषात शिलान्यासाचा कार्यक्रम संपन्न झाला. १२ वाजून ४४ मिनिटांनी भूमिपूजन सोहळा पार पडला.पंतप्रधान मोदींच्या हस्ते ९ शिळांचं पूजन करण्यात आलं. या शिळांचं महत्त्व पुजाऱ्यांनी सांगितलं. '१९८९ मध्ये जगभरातल्या भाविकांनी मंदिरासाठी विटा पाठवल्या होत्या. अशा २ लाख ७५ हजार विटा अयोध्येत आहेत. त्यातल्या १०० विटांवर जय श्रीराम लिहिण्यात आलं आहे. त्यातल्याच ९ विटा आज इथे आणण्यात आल्या आहेत,' अशी माहिती पुजाऱ्यांनी भूमिपूजन सुरू असताना दिली.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याNarendra Modiनरेंद्र मोदी