न्यूयॉर्क - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस मॅनहॅटन येथे पार पडणा-या न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये सहभागी झाल्या असून त्या शो टॉपर म्हणून रॅम्पवरही उतरल्या. या फॅशन शोमध्ये मुलींच्या शिक्षणाबद्दल जागृती करण्यात येत असून हातमागावरील भारतीय कपड्यांचे प्रमोशन हा देखील उद्देश आहे. पुण्यातील चासा इन्स्टिट्यूट आॅफ डिझाईन अँड टेक्नॉलॉजीच्या वतीने अमृता फडणवीस यांना ही संधी मिळाली. ही इन्स्टिट्यूट गरीब गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण देते. या फॅशन वीकमध्ये विद्यार्थ्यांनीच डिझाईन केलेल्या कपड्यांचे प्रमोशन करण्यात येत आहे. हे कपडे परिधान करु न मॉडेल रॅम्पवर उतरल्या तेव्हा त्यांच्या हातात मुलींच्या शिक्षणावर भर देण्याचे आवाहन करणारे पोस्टर्सदेखील होते. ज्यांनी हे कपडे डिझाईन केले आहेत त्या सर्व शेतकरी आणि मजुरांच्या मुली आहेत. हा अभिनव उपक्र म आहे. मुलगी शिकली की एक कुटुंब शिकते आणि देशाची प्रगती होते, अशी भावना अमृता फडणवीस यांनी व्यक्त केली. वरिष्ठ बँक अधिकारी असलेल्या अमृता या उत्तम गायिकादेखील आहेत.
अमृता फडणवीस यांचा रॅम्प वॉक
By admin | Published: September 09, 2016 5:34 AM