शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

आर्थिक संकटाच्या काळात श्रीलंकेचे पंतप्रधानपद स्वीकारणाऱ्या विक्रमसिंघेंचं भारताबाबत मोठं विधान, म्हणाले...  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 10:39 PM

Ranil Wickremesinghe News: देशावर आलेल्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटादरम्यान, गुरुवारी रानिल विक्रमसिंघे यांनी श्रीलंकेचे २६ वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. पंतप्रधान बनल्यानंतर विक्रमसिंघे यांनी भारतासोबतच्या संबंधांबाबत मोठं विधान केलं आहे.

कोलंबो - देशावर आलेल्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटादरम्यान, गुरुवारी रानिल विक्रमसिंघे यांनी श्रीलंकेचे २६ वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. पंतप्रधान बनल्यानंतर विक्रमसिंघे यांनी त्यांचं प्राधान्य अर्थव्यवस्था सुरळीत करून देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यास असेल, असं सांगितलं. त्यांनी भारताबरोबरच्या संबंधांबाबत सांगितलं की, आपल्या कार्यकाळात दोन्ही देशातील संबंध अधिक दृढ होतील, असे विक्रमसिंघे म्हणाले.

पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर विक्रमसिंघे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, मी अर्थव्यवस्थेच्या उत्थानाचे आव्हान स्वीकारले आहे. मी हे आव्हान अवश्य पूर्ण करेन, यावेळी त्यांना भारतासोबतच्या संबंधांबाबत विचारणा करण्यात आली. तेव्हा त्याबाबत विक्रमसिंघे म्हणाले की, दोन्ही देशांमधील संबंध हे आधीपेक्षा अधिक चांगले होतील. रानिल विक्रमसिंघे देशातील सर्वात जुन्या पक्ष असलेल्या युनायटेड नॅशनल पार्टीचे नेते आहेत. चारवेळा त्यांनी श्रीलंकेचं पंतप्रधानपद भूषवलं आहे. मात्र २०२० मध्ये झालेल्या निवडणुकीत यूएनपीला एकही जागा जिंकता आली नाही. यूएनपीचा मजबूत बालेकिल्ला असलेल्या कोलंबो मतदारसंघातून विक्रमसिंघे यांनी निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा पराभव झाला. कम्युलेटिव्ह नॅशनल व्होटच्या आधारे यूएनपीला एक जागा देण्यात आली. त्या माध्यमातून विक्रमसिंघे संसदेत पोहोचले.

आतापर्यंत चारवेळी श्रीलंकेचे पंतप्रधान राहिलेल्या विक्रमसिंघे यांना ऑक्टोबर २०१८ मध्ये राष्ट्रपती मैत्रीपाला सिरिसेना यांनी पंतप्रधानपदावरून हटवलं. मात्र दोनच महिन्यांत त्यांनी पुन्हा पंतप्रधानपदाची सुत्रं हाती घेतली. आता त्यांना सत्ताधारी श्रीलंका पोदुजाना पेरामुना आणि विरोधी पक्ष असलेल्या समगी जन बालावेगायामधील एका गटासह अन्य अनेक पक्षांनी पाठिंबा दर्शवला आहे.

टॅग्स :Sri Lankaश्रीलंका