न्यूयॉर्क : दक्षिण सुदानमध्ये लष्कराला वेतनाची भरपाई म्हणून महिलांवर बलात्कार करण्याची परवानगी दिली जाते, असा खळबळजनक गौप्यस्फोट संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालात करण्यात आला आहे. या अहवालानुसार दक्षिण सुदानमधील युनिटी राज्यात गेल्या वर्षी १३00 महिलांवर बलात्कार करण्यात आला.दक्षिण सुदानमध्ये सरकार समर्थक बंडखोरांतर्फे सरकारी लष्कराला अशा स्वरूपाची मदत केली जाते. या भागात मुले आणि अपंगांना जिवंत जाळण्यात आले आणि मुलींना वेतन म्हणून सैनिकांच्या हवाली करण्यात आले, असे हा अहवाल म्हणतो.या चौकशीत यादवीत सामील असलेल्या सर्व पक्षांना सामील करण्यात आले होते. दक्षिण सुदानमधील यादवीत नागरिकांनाच लक्ष्य करण्यात आले. त्यांची हत्या करण्यात आली आणि व्यापक प्रमाणावर बलात्कार करण्यात आले. हा प्रकार म्हणजे जगातील भयावह मानवी संकट असल्याचे हा अहवाल म्हणतो. अहवालात पुढे म्हटले आहे की, विरोधी गटाचे समर्थन करणाऱ्यांवर भयावह अत्याचार करण्यात आले. मुले आणि अपंगांनाही सोडण्यात आले नाही. त्यांना जिवंत जाळून त्यांची हत्या करण्यात आली. एवढेच नव्हे, तर कंटेनरमध्ये घालून त्यांना भाजण्यात आले. गोळ्या घालून ठार मारण्यात आले. फाशी देऊन शरीराचे तुकडे तुकडे करण्यात आले.१३00 पेक्षा जास्त बलात्कारांची प्रकरणे एकट्या युनिटी राज्यात नोंदली गेली. तेलाने संपन्न असलेल्या या देशात गेल्या पाच वर्षांपासून अराजकाची स्थिती आहे. एका महिलेने सांगितले की, सैनिकांनी प्रथम माझे कपडे फाडले आणि मुलांच्या समोरच पाच सैनिकांनी बलात्कार केला. त्यानंतर अनेकांनी जंगलात माझ्यावर बलात्कार केला. माझी मुलेही बेपत्ता झाली.सरकार समर्थक गटांनी महिलांवर बलात्कार करण्याची परवानगी दिली होती. सरकारशी प्रामाणिक राहण्यासाठी बक्षिसी म्हणून त्यांना असे करू दिले जात होते. विरोधी गटातर्फेही असेच करण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
वेतनाच्या बदल्यात सैनिकांना बलात्काराची मुभा
By admin | Published: March 13, 2016 4:13 AM