जेरुसलेम/दुबई : फेडरेशन ऑफ इंडो इस्त्रायल चेंबर ऑफ कॉमर्स (एफआय आयसीसी)ने ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना प्रतिष्ठेचा ग्लोबल व्हिजनरी ऑफ सस्टेनेबल बिझनेस ॲण्ड पीस हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. एकता, शांती आणि स्थिरता यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. एका व्हर्च्युअल कार्यक्रमामध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या संघटनेचे अध्यक्ष गुल कृपलानी यांनी सांगितले की, इस्त्रायलबाबत रतन टाटा यांनी कायम भक्कम पाठिंबा दिला आहे. भारताचा सन्मान कायम राखत त्याला वैश्विक पातळीवर पुढे नेण्याबाबत त्यांनी केलेले कार्य वाखाणण्याजोगे आहे. एकता,शांतता आणि स्थैयर् यांचे प्रतीक असलेल्या टाटा यांचा भारत, इस्त्रायल आणि संयुक्त अरब अमिराती येथील उद्योग जगतामध्ये आदर केला जातो. म्हणूनच त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली गेली आहे. या कार्यक्रमामध्ये बोलताना टाटा यांनी पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. भारत आणि इस्त्रायल या दोन्ही देशांमध्ये सहकार्य असण्याची गरज प्रतिपादित करतानाच त्यांनी येथील उद्योगांनी एकमेकांना मदत केल्यास नियार्त वाढू शकेल, याकडे लक्ष वेधले. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर आभासी पद्धतीने उपस्थित होते.
रतन टाटा यांना प्रतिष्ठेचा पुरस्कार, एफआयआयसीसीने केले सन्मानित
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2020 4:58 AM