कोलंबो : पाच हजार वर्षांपूर्वी रावणाने पहिल्यांदा विमानाचा वापर केला होता, असा दावा श्रीलंका सरकारने केला आहे. तसेच, श्रीलंकेच्या सरकारने एक जाहिरात देत लोकांना रावणाबद्दल कोणतेही कागदपत्रे असतील तर ती शेअर करण्यास सांगितले आहे. पर्यटन व उड्डयन मंत्रालयाने वेगवेगळ्या वृत्तपत्रात ही जाहिरात दिली आहे.
दरम्यान, रावण श्रीलंकेच्या लोकांसाठी एक महान राजा होता. जाहिरातीमध्ये लोकांना पौराणिक राजा आणि हरवलेल्या वारसा संशोधनात मदत करण्यासाठी रावणाशी संबंधित कोणतीही कागदपत्रे किंवा पुस्तके शेअर करण्याची विनंती केली गेली आहे. श्रीलंकेच्या नागरी उड्डयन प्राधिकरणाने आता रावणाने प्राचीन काळात उड्डाण करण्यासाठी वापरल्या जाणार्या पद्धती समजून घेण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
यासंदर्भात श्रीलंकेच्या नागरी उड्डयन प्राधिकरणाचे माजी उपाध्यक्ष शशी डनाटुंज म्हणाले की, "हे सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे भरपूर तथ्य आहे. पुढील पाच वर्षांत आम्ही ते सिद्ध करू. "
गेल्या वर्षी नागरी उड्डयन तज्ज्ञ, इतिहासकार, पुरातत्वशास्त्रज्ञ, शास्त्रज्ञ यांची एक परिषद काटुनायकेमध्ये आयोजित केली होती. याठिकाणी श्रीलंकेचे सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय विमानतळ बंदरानाइक आहे. या परिषदेत निष्कर्ष काढला होता की, रावणाने पाच हजार वर्षांपूर्वी श्रीलंकेहून सध्याच्या भारताकडे उड्डाण केले होते आणि भारतातून परत आला होता.
दरम्यान, प्राचीन लंकेच्या राजाबद्दल या दिवसांमध्ये श्रीलंकेतील लोकांना जास्तच रस आहे. श्रीलंकेने नुकतीच आपल्या पहिल्या अंतराळ मोहिमेअंतर्गत रावण नावाचा उपग्रह पाठविला आहे. श्रीलंकेतील बर्याच लोकांना असा विश्वास आहे की, रावण दयाळू राजा आणि अभ्यासू होता.
आणखी बातम्या....
सरकारी कर्मचार्यांसाठी खूशखबर! नाईट शिफ्ट केली तर आता असा होणार फायदा...