माद्रिद - कोरोनाने संपूर्ण जगाला आपल्या मगरमिठीत घेतले आहे. याचा सर्वाधिक फकटा युरोपला बसला आहे. येथून दिवसागणीक मृत्यूचे नवनवे आकडे समोर येत आहेत. इटलीनंतर आता स्पेनही अत्यंत वेदनादायक परिस्थितीतून मार्गक्रमण करताना दिसत आहे. येथे कोरोणामुळे एकाच दिवसात तब्बल 832 जणांचा मृत्यू झाल्याचे समजते.
युरपमधील इटलीला कोरोनाने सर्वाधिक तडाखा दिला आहे. एकाच दिवसात स्पेनपेक्षाही अधिक लोकांचा मृत्यू इटलीमध्ये झाला आहे. येथे शुक्रवारी एकाच दिवसात तब्बल 969 जणांचा मृत्यू झाला.
माद्रिदमधील स्थिती सर्वात वाईट -आता स्पेनमध्ये कोरोना संसर्गामुळे मरणारांचा आकडा 5,690वर पोहोचला आहे. येथे गेल्या 24 तासांत 8000 नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. स्पेनच्या आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, येथे तब्बल 72,248 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 4,575 लोकांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर 12,285 लोक बरे झाले आहेत. यापूर्वी शुक्रवारी येथे 769 लोकांचा मृत्यू झाला आहे. स्पेनमध्ये सर्वाधिक खराब स्थिती माद्रिदमध्ये आहेत.
अमेरिकेत सर्वाधिकि रुग्ण - अमेरिकेतील कोरोनाबधितांचा आकडा एक लाखांच्या पार पोहोचला आहे. तेथे आतापर्यंत कोरोनामुळे 1544 जणांचा मृत्यू झाला आहे. जॉन हॅपकिंग विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार काल 24 तासांत तेथे सुमारे 18 हजार जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 345 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील कोरोनाबाधितांचा आकडा आता 1 लाख 717च्या पुढे गेला आहे.
कोरोना व्हायरसमुळे जगभरात आतापर्यत 27,370 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर जवळपास 6,00,000 जणांना त्याचा संसर्ग झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे 1,33,373 लोक बरे झाल्याची माहिती आहे. यामुळे भारतात आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे.