चीनची स्मार्टफोन कंपनी शाओमीने ५जी स्मार्टफोन बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे. किंमती सामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्या तरीही स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कंपन्या हे फोन लाँच करत आहेत. शाओमीची उपकंपनी Redmi ने K30i 5G हा स्मार्टफोन लाँच केला आहे. 48MP क्वाड कॅमेरा आणि दोन सेल्फी कॅमेरा असे सहा कॅमेरे देण्यात आले आहेत.
महत्वाचे म्हणजे या फोनच्या स्क्रीनचा रिफ्रेश रेट 120Hz एवढा जास्त आहे. ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या य़ा फोनमध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी+ IPS डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनचा डिस्प्ले ड्युअल पंचहोल डिझाईनसोबत येतो. स्नॅपड्रॅगन ७६५जी एसओसी जी प्रोसेसर यामध्ये वापरण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉईड १० वर आधारित असून MIUI 11 देण्यात आली आहे.
फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये ४८ मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरसोबत ८ मेगापिक्सल अल्ट्रा वाईड कॅमेरा, ५ मेगापिक्सलचा सुपर मायक्रो युनिट आणि एक २ मेगापिक्सलचा डेप्थ युनिट देण्य़ात आले आहे. या फोनला ४५०० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच फास्ट चार्जिंगसाठी ३० वॉटचा चार्जरही देण्य़ात आला आहे.
सध्या हा फोन चीनमध्येच उपलब्ध असणार आहे. चीनमध्ये याची किंमत १९९९ युआन म्हणजे २१३०० रुपये आहे. या फोनची विक्री २ जूनपासून सुरु केली जाणार आहे. भारतातील लाँचिंगबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. मात्र, काही रिपोर्टनुसार येत्या १० जूनला हा फोन भारतात लाँच केला जाण्याची शक्यता आहे. सध्या रे़डमीचा आणखी एक ५जी फोन भारतात उपलब्ध आहे. या फोनची किंमत ४९००० हजाराच्या आसपास आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
व्वा भाई व्वा! भावाने न सांगताच UPSC चा फॉर्म भरला; बहीण आयएएस झाली
CoronaVirus कोरोनामुळे जग बुडाले पण फेसबुकद्वारे जोडणारा झकरबर्ग मालामाल झाला
CoronaVirus अडेलतट्टू चीन नरमला; तातडीने कोरोना जन्माच्या तपासाला तयार झाला
चीनला हादरा! इकडे भारतावर दादागिरीचे प्रयत्न; तिकडे हाँगकाँग निसटण्याच्या बेतात