न्यूयॉर्क : २०२० मध्ये गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर भारत आणि चीनमधील संबंध “सामान्य” नाहीत आणि कदाचित हा मुद्दा अपेक्षेपेक्षा जास्त काळ पुढे ताणला जाऊ शकतो. सीमेवर आपले सैन्य जमविण्याबाबत चीनने दिलेले कोणतेही स्पष्टीकरण न पटण्यासारखे आहे, असे वक्तव्य परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी केले आहे.
परराष्ट्रमंत्री सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. ते म्हणाले की, पूर्व लडाखच्या सीमेवर परिस्थिती सामान्य नाही, याबाबत भारत सतत आवाज उठवत आहे. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध सामान्य करण्यासाठी सीमेवर शांतता आणि सलोखा महत्त्वाचा आहे. परराष्ट्र संबंध परिषदेत भारत-चीन संबंधांबाबत विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, जगातील दोन मोठ्या देशांमध्ये एवढ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला तर त्याचा परिणाम सर्व जगावर होईल.कठोर लॉकडाऊन असताना...
ते म्हणाले की, १९९३ आणि १९९६ मध्ये भारताने चीनसोबत सीमा स्थिरतेसाठी दोन करार केले. भारत किंवा चीन दोघेही प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सैन्य जमा करणार नाहीत आणि जर दोन्ही बाजूंनी ठरावीक संख्येपेक्षा जास्त सैन्य आणले तर ते दुसऱ्या बाजूला कळवतील, असे यात स्पष्टपणे म्हटले होते. २०२० पर्यंत हीच परिस्थिती होती. मात्र, कोरोनात आम्ही मोठ्या संख्येने चिनी सैन्य सीमेवर जाताना पाहिले. त्यानंतर दोन्ही देशांत संघर्ष झाला आणि आमचे २० सैनिक शहीद झाले, असे ते म्हणाले.
परराष्ट्र मंत्री म्हणाले..n सध्या दोन्ही देशांत चर्चा सुरू असली तरी चीनकडून करारांचे उल्लंघन करून मोठ्या संख्येने सैनिक सीमेवर तैनातn चीनशी सध्या सामान्यपणे वागणे खूप कठीण. चिनी नौदलाची झपाट्याने वाढ होत आहे. ते कुठेतरी तैनात करण्याचा त्यांचा विचार असेल n चीनच्या आव्हानाला हे सरकार चोख प्रत्युत्तर देईल.
चीन खोटारडा २००९ ते २०१३ या काळात चीनमध्ये भारताचे राजदूत राहिलेले जयशंकर म्हणाले, की, चीनसोबतच्या संबंधांची खासियत ही आहे की ते असे का करतात हे ते कधीच सांगत नाहीत. आपण ज्यावेळी याचा शोध घ्यायला जातो, त्यावेळी अनेक बाबी संदिग्ध राहतात. चीनने याबाबत अनेक स्पष्टीकरणे दिली आहेत, परंतु त्यापैकी एकही खरे नाही.
भूमिका बदललीपरराष्ट्र मंत्री म्हणाले की, ज्या देशाने करार मोडले आहेत, त्यांच्याशी सामान्य राहण्याचा प्रयत्न करणे खूप कठीण आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षांचा आढावा घेतला तर ही काही सामान्य परिस्थिती नाही. दोन्ही देशांतील संपर्क बिघडला आहे. प्रवास थांबला आहे. आमच्याकडे लष्करी तणाव नक्कीच जास्त आहे. याचा परिणाम भारताच्या चीनबाबतच्या भूमिकेवरही झाला आहे.