मोरोक्कोचा स्टार फुटबॉलपटू अश्रफ हकिमी (२४) याच्या घटस्फोटाची सध्या सोशल मीडियात चर्चा आहे. पत्नी हिबा (३६) हिने घटस्फोटाच्या निपटाऱ्यासाठी पतीची अर्धी संपत्ती मिळावी, अशी मागणी केली होती; परंतु तिचा मोठा भ्रमनिरास झाला.
उल्लेखनीय म्हणजे हकिमीला मोरोक्कोच्या आंतरराष्ट्रीय संघातून आणि पीएसजीसारख्या नामांकित क्लबकडून खेळण्यासाठी दरमहा तब्बल १ दशलक्ष युरो मिळतात; परंतु या रकमेपैकी ८० टक्के रक्कम त्याच्या आईच्या खात्यात जमा केली जाते. तो सर्वाधिक कमाई असलेल्या आफ्रिकन फुटबॉलपटूंपैकीही एक आहे. आईमुळे संपत्ती वाचली, अशा कॅप्शनसह ही बातमी व्हायरल होत आहे.
रिपोर्ट्सनुसार, तुझ्या कोट्यधीश नवऱ्याच्या नावावर काहीही नाही, कारण त्याची सर्व संपत्ती त्याच्या आईच्या नावाखाली नोंदणीकृत आहे, असे कोर्टाने तिला सांगितले.