शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
3
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
4
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
6
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
7
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
8
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
9
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
10
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
11
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
12
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
13
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
14
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
15
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
17
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
18
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
19
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
20
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!

पुन्हा पुन्हा वापरता येणारा अग्निबाण विकसित; चाचणी यशस्वी

By admin | Published: December 23, 2015 2:34 AM

अमेरिकेच्या स्पेस एक्स कंपनीने फाल्कन -९ अग्निबाण अवकाशात सोडून तो परत जमिनीवर पूर्ववत उतरविण्यात मंगळवारी यश प्राप्त केले आहे.

मियामी : अमेरिकेच्या स्पेस एक्स कंपनीने फाल्कन -९ अग्निबाण अवकाशात सोडून तो परत जमिनीवर पूर्ववत उतरविण्यात मंगळवारी यश प्राप्त केले आहे. विमानांसारखा पुन्हा वापरता येण्याजोगा अग्निबाण बनविण्याचा हा पहिलाच प्रयोग असल्यामुळे ऐतिहासिक मानला जात आहे. पृथ्वीवर परतण्यापूर्वी ११ संदेश दळणवळण उपग्रह या अग्निबाणाने सुरक्षित अवकाश प्रक्षेपित केले. कॅलिफोर्नियाच्या हॉथ्रोन येथील कंपनीच्या मुख्यालयात उत्साहित व आनंदी वातावरणात एकत्र जमलेल्या सहकाऱ्यांसमोर प्रवक्त्याने ‘फाल्कन जमिनीवर सुखरूप परतले’ असे जाहीर करताच एकच जल्लोष झाला. स्पेस एक्सच्या बेव प्रसारणात अग्निबाण केप कनेवेराल तळावर यशस्वीरीत्या उतरत असल्याचे दाखविण्यात आले. कंपनीने टष्ट्वीट करूनही ही बातमी दिली. त्यात म्हटले आहे की, फाल्कनने पहिला टप्पा पार पाडला आहे. अमेरिकन अवकाश संशोधन संस्था नासाने कंपनीला अभिनंदनाचा संदेश धाडला आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे अवकाश संशोधनात एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. अग्निबाण पुन्हा पुन्हा वापरात आल्याने खर्चात कपात होईल. यापूर्वी जूनमध्ये झालेला प्रयोग फसला होता. फाल्कनचे तुकडे तुकडे होऊन तो पेटला होता. यावेळी सुधारित असा २३ मजली उंच अग्निबाण केप कनेवेराल हवाई तळावरून अवकाशात झेपावला व अवघ्या १० मिनिटात आपली कामगिरी पार पाडून तळाच्या दक्षिणेकडील ९ कि.मी. अंतरावरील तळावर परतला. (वृत्तसंस्था)> नवा शोध... ‘स्पेस एक्स’ कंपनीचा ‘फाल्कन ९’ अग्निबान मंगळवारी अकरा उपग्रहांसह अंतराळात झेपावला व अवघ्या दहा मिनिटात कामगिरी पार पाडून परत तळावर आला. कंपनीच्या वेबसाईटवर ही घटना दाखविण्यात आली. अनेक प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर आज ही कामगिरी यशस्वी पार पडली.