सुरेश भटेवरा नवी दिल्ली : चीनने डोकलाम भागात रस्ता बांधण्याची तयारी पुन्हा सुरू करताच, भारत- चीन सीमेवरील सर्व महत्त्वाच्या खिंडींजवळ जवळपास १00 नवे रस्ते बांधण्याची रणनीती भारत सरकारने तयार केली आहे. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी दुपारी डोकलाम नाथु-ला क्षेत्राचे हवाई सर्वेक्षण केले. सीमावर्ती भागात पहिल्या टप्प्यात महत्त्वाचे २५ रस्ते, तर दुसºया व तिसºया टप्यात प्रत्येकी ५0 नवे रस्ते तयार होणार असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांकडून या दौºयाच्या निमित्ताने प्राप्त झाली.भारत-चीन दरम्यानच्या सीमावर्ती भागात १00 पेक्षा अधिक खिंडी आहेत व त्यापैकी ९० टक्के खिंडी एवढ्या दुर्गम भागात आहेत की, तेथे जाण्यासाठी रस्तेच अस्तित्वात नाहीत. सिक्कीम जवळच्या नाथू-ला खिंडीप्रमाणे सीमावर्ती भागातील प्रत्येक खिंडीपाशी पायाभूत सुविधा तयार असाव्यात व त्यामुळे या क्षेत्रात भारतीय सैन्यदलांच्या हालचाली अधिक सुकर व्हाव्यात, अशी सरकारची रणनीती आहे. अरुणाचल प्रदेश, ईशान्य भारतात चीनला लागूून असलेल्या सीमेवर, तसेच उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, आदी राज्यातल्या सीमावर्ती भागात २0२२ पूर्वी सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे रस्ते बांधण्याची तयारी त्यासाठीच भारत सरकारने चालविली आहे. अशी माहिती या सूत्रांकडून प्राप्त झाली.संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी अरुणाचल प्रदेश व सिक्कीमचा एक दिवसाचा दौरा करून या भागाची हवाईपाहणी केली. चीन व भारत या दोन्ही देशांनी राजनैतिक वाटाघाटींनंतर डोकलाम सीमेजवळचा फौजफाटा २८ आॅगस्ट रोजी मागे घेतला. त्यानंतर, संरक्षणमंत्र्यांचा या भागातला हा पहिलाच दौरा होता.डोकलाम भागात २८ आॅगस्टनंतर चिंता वाढविणारी एकही घटना घडलेली नाही. उभयपक्षांत शांतता असली, तरी ट्रायजंक्शनपासून १२ किलोमीटर अंतरावर चीनने रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम पुन्हा सुरू केले व त्यासाठी सैन्याची जमवाजमव सुरू केली, असे वृत्त धडकल्यानंतर सीतारामन यांचा या भागातला प्रत्यक्ष पाहणी दौरा सूचक ठरला आहे. संरक्षण मंत्रालयानुसार डोकलाम भागात २८ आॅगस्टनंतर जैसे थे स्थिती आहे. संरक्षणमंत्र्यांनी या दौºयात सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील मुख्यमंत्री पवन चामलिंग यांचीही भेट घेतली. सीमावर्ती भागात अग्रक्रमाने नवे रस्ते तयार करण्याची सरकारची रणनीती योग्य व आवश्यक आहे, असे या सूत्रांनी सांगीतले.
डोकलामला प्रत्युत्तर : चीनच्या सीमावर्ती भागात १00 नवे रस्ते बांधणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2017 12:38 AM