लाहोर : पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ, त्यांचे बंधू व भाचा, तसेच काही कॅबिनेट मंत्री यांच्यावर एफआयआर दाखल करावा, अशी मागणी कॅनडा येथे वास्तव्यास असणारे धर्मगुरू तहिरुल काद्री याने केली आहे. पोलिसांनी लाहोर येथील त्याचे घर व कार्यालयावर छापे टाकून 1क् माणसांना ठार मारल्याचा आरोप त्याने केला आहे.
या निष्पाप लोकांना ठार मारणा:या नवाज शरीफ व त्यांचे भाऊ शहाबाज शरीफ यांच्यासह सर्वाच्या विरोधात एफआयआर दाखल करावा, असा अर्ज काद्री याने लाहोर पोलिसांत केला आहे. काद्री याची संघटना मिन्हाजुल कुराण ट्रस्टतर्फे केलेल्या अर्जात गृहमंत्री चौधरी निसार अली खान, संरक्षणमंत्री ख्वाजा असिफ, रेल्वेमंत्री ख्वाजा साद रफिक, माहिती मंत्री परवेज रशीद, राज्यमंत्री अबीद शेर अली, पंजाबचे विधीमंत्री राणा सानुल्ला व ज्येष्ठ पोलीस अधिका:यांची नावे आहेत.
फैसल पोलीस ठाण्यात हा अर्ज दाखल करण्यात आला आहे; पण वरिष्ठांच्या परवानगीशिवाय एफआयआर दाखल करता येणार नाही, असे पोलिसांनी म्हटले आहे. पाकिस्तानी मुस्लिम लीग क्यू व पाकिस्तानी सुन्नी कौन्सिल नेत्यांनी काद्री याच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. (वृत्तसंस्था)