शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

 भारतीयाच्या भविष्यवाणीमुळे पाकिस्तानमध्ये पळापळ, आयएसआयने तातडीने दिला अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2017 5:00 PM

एका भारतीय व्यक्तीने केलेल्या भविष्यवाणीमुळे पाकिस्तानमधील सरकारी यंत्रणांची सध्या चांगलीच पळापळ सुरू आहे.

नवी दिल्ली - एका भारतीय व्यक्तीने केलेल्या भविष्यवाणीमुळे पाकिस्तानमधील सरकारी यंत्रणांची सध्या चांगलीच पळापळ सुरू आहे. या भविष्यवाणीतील उल्लेखाचा गांभीर्याने विचार करत पाकिस्तानमध्ये भूकंपाचा इशारा जारी करण्यात आला आहे.  केरळमधील एका एक्स्ट्रासेंसरी पर्सेप्शन संस्थानाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या एका पत्रामुळे पाकिस्तानमध्ये ही खळबळ उडाली आहे. शनिवारी पाकिस्तानमधील भूकंप पुनर्निर्माण आणि पुनर्वास प्राधिकरणाकडून एक पत्र प्रकाशित करण्यात आले आहे. या पत्रामधून आशियामध्ये मोठ्या तीव्रतेचा भूकंप येऊ शकतो, अशी शक्यता वर्तवणाऱ्या आयएसआयकडून प्रसारित करण्यात आलेल्या एका अहवालाचा हवाला देऊन सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.  पाकिस्तानी गुप्तहेर यंत्रणा असलेल्या आयएसआयचा हा अहवाल केरळमधील इएसपी क्षेत्रात काम करणाऱ्या बी. के. रिसर्च असोसिएशनच्या एका पत्रावर आधारित होता. या पत्रामध्ये व्याकरणाच्या अनेक चुका असून, हे पत्र कंपनीचे संचालक बाबू कलाइन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेले आहे. या पत्रामधून भूकंपाबाबत सावधगिरी बाळगण्याचा इशारा सरकारला देण्यात आला होता. पाकिस्तानमधील एक्स्प्रेस ट्रिब्युनमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार या पत्रामधून 31 डिसेंबरपूर्वी एक मोठा भूकंप येईल, अशी भविष्यवाणी करण्यात आली आहे. आशिया खंडात येणाऱ्या या महाभयंकर भूकंपामुळे 11 देशांना फटका बसेल. तसेच भूकंपाच्या तीव्रतेमुळे समूद्राच्या सीमासुद्धा बदलतील, अशी भीती या पत्रातून व्यक्त करण्यात आली आहे. तसेच भूकंपाबरोबरच सीस्मा नावाचे वादळ येईल. त्याचा वेग 120 ते 180 किमी असेल, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल, अशीही भविष्यवाणी करण्यात आली आहे. दरम्यान. कलइन यांच्या फेसबुक अकाऊंटवर करण्यात आलेल्या एका पोस्टनुसार त्यांनी याआधीही अशा शक्यता वर्तवल्या आहेत. तिकडे पाकिस्तानमध्ये शनिवारी आयएसआयच्या अहवालावर तातडीने कारवाई करत भूकंप पुनर्निर्माण आणि पुनर्वास प्राधिकरणाकडून एक पत्र प्रसारित करण्यात आले आहे. ज्यामधून परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी अधिकाऱ्यांचे एक पथक स्थापित करण्याची सूचन देण्यात आली आहे. तसेच पाकिस्तानचे अमेरिकेतील माजी राजदूत हुसेन हक्कानी यांनीही या पत्राची एक प्रत आपल्या ट्विटरवरून शेअर केली आहे.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतEarthquakeभूकंपKeralaकेरळ