वॉशिंग्टन - अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार सुरू झाला आहे. रिपब्लिकन पक्षाकडून अधिकृत उमेदवारी स्वीकारल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी बायडन यांच्यावर निशाणा साधला आहे. निवडणुकीत बायडन विजयी झाल्यास चीन आपल्या देशावर ताबा मिळवेल असं म्हणत हल्लाबोल केला आहे. बायडन यांचा निवडणूक अजेंडा हा मेड इन चायना असून माझा अजेंडा मेड इन अमेरिका आहे असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी या निवडणुकीत पुन्हा विजयी झाल्यास आगामी चार वर्षात अमेरिकेला मॅन्यूफॅक्चरिंगमध्ये सुपरपॉवर बनवू. देशामध्ये रोजगाराच्या संधी विकसित करण्यासोबतच आरोग्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. अमेरिकेची चीनवरील निर्भरता पूर्णपणे नष्ट करू तसेच वॉशिंग्टनमध्ये चीनविरोधात न बोलण्याचा सल्ला मला काही जणांनी दिला होता. चीनने आपल्या देशातील रोजगार चोरला तरी हरकत नाही असे काहींनी म्हटले होते. मात्र अमेरिकन जनतेला वचन दिले होते. अमेरिकेच्या इतिहासात आतापर्यंतचे चीनविरोधात सर्वात मोठे पाऊल उचललं असल्याचं म्हटलं आहे.
अमेरिकेसह संपूर्ण जगच कोरोनाचा संकटाचा सामना करत आहे. चीनने कोरोनाचा संसर्ग जगात केल्याचं देखील ट्रम्प यांनी म्हटलं आहे, तसेच अमेरिकेत कोरोनाच्या तीन लसी चाचणीच्या अंतिम टप्प्यात आहेत. यावर्षी कोरोनावर प्रभावी लस आणणार. अमेरिका चंद्रावर पहिली महिला अंतराळवीर उतरवणार असल्याची घोषणाही डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
कोरोनाच्या संकट काळातही अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत चांगलीच चूरस निर्माण झाल्याचं चित्र आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिस्पर्धी डेमोक्रेटिक पक्षाचे नेते जो बायडन यांनी काही दिवसांपूर्वी मोठी घोषणा केली होती. सत्तेत आल्यास भारतासोबत असलेले द्विपक्षीय संबंध अधिक वृद्धिंगत करणार असल्याचं बायडन यांनी जाहीर केलं आहे. तसेच प्रसंगी एच-1बी व्हिसा रद्द करण्याचा निर्णयात बदल करू, असंही बायडन यांनी सांगितलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : भारताकडे कधी असणार कोरोना लस आणि किंमत किती?, रिसर्चमधून आली आनंदाची बातमी
"कोरोना चाचण्या वाढू नयेत यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाचा दबाव", आरोग्यमंत्र्यांचा आरोप
देशात 1 सप्टेंबरपासून सर्वांचं वीज बिल माफ होणार?, जाणून घ्या 'त्या' व्हायरल मेसेजमागचं सत्य
"आमच्यावर हल्ला कराल तर..."; छोट्याशा शेजारी देशाचा चीनला थेट इशारा
CoronaVirus News : कोरोनाचा धसका! अचानक लोक झाले गायब, 'या' गावातील 90 टक्के घरांना टाळं