शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
2
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
3
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
4
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
5
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
6
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
7
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
8
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
9
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक
10
...तर ५० उमेदवार उभे केले असते, समाजाचे योगदान वाया जाऊ देणार नाही; मनोज जरांगेंचे सूचक भाष्य
11
शिवसेना ही बाळासाहेबांची मालमत्ता खरे आहे, पण..; दीपक केसरकरांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर 
12
Maharashtra Election 2024: सरकार आल्यास मविआ कोणासाठी काय करणार? ठाकरेंनी सांगून टाकलं
13
Eknath Shinde : "....मी एकदा नाही तर १० वेळा जेलमध्ये जायला तयार"; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना ठणकावलं
14
लोकसभा निवडणुकीत भुजबळांकडून राजाभाऊ वाजेंना मदत?; हेमंत गोडसेंनी शिवसैनिकांसमोर केला गंभीर आरोप!
15
सुशांतची आत्महत्या नाही तर हत्या! सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचा खळबळजनक दावा, म्हणते, डॉक्टरांनी बदलले पोस्टमोर्टम रिपोर्ट
16
“जयश्री पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार, यांनाच निवडून द्या”; विशाल पाटील यांचे आवाहन
17
ऐन विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या ५ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
18
उमेदवार अर्ज मागे घेण्यासाठी पोहोचला, पण...; अवघ्या १५ सेकंदात घडल्या नाट्यमय राजकीय घडामोडी!
19
मानखुर्दमध्ये अबु आझमींची ठाकरे गटाच्या शाखेला भेट; ठाकरेंचे शिवसैनिक करणार प्रचार
20
Parliament Winter Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबर ते २० डिसेंबर पर्यंत चालणार; केंद्रीय मंत्र्यांनी माहिती दिली

"...तेव्हा १४ वर्षांच्या मुलीला pregnant केलं होतं"; अमेरिकी खासदाराच्या गौप्यस्फोटाने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 7:35 PM

anthony bouchard : बूचार्ड यांनी मुलगी १५ वर्षांची असताना तिच्याशी लग्न केले आणि ते १९ वर्षांचे होते आणि दोघे फ्लोरिडामध्ये राहत होते. तीन वर्षानंतर त्यांचा घटस्फोट झाला.

ठळक मुद्देबूचार्ड यांनी अमेरिकेच्या कॅपिटलमध्ये ८ जानेवारी रोजी झालेल्या हिंसाचाराबद्दल माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालविण्यास मतदान केले होते.

ज्यावेळी १८ वर्षांचा होतो, त्यावेळी १४ वर्षांच्या मुलीला प्रेग्नंट केले होते, असा धक्कादायक गौप्यस्फोट अमेरिकेतील खासदार अँथनी बूचार्ड यांनी केला आहे. यानंतर अमेरिकेच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. व्योमिंग स्टेटचे खासदार अँथनी बोचार्ड सिनेटमध्ये रिपब्लिकनचे प्रतिनिधी लिज चेनी यांना पदच्युत करण्याच्या शर्यतीत होते. (republican senator anthony bouchard reveals he impregnated a 14 year old girl at 18)

बूचार्ड म्हणाले, "वयाच्या १८ व्या वर्षी १४ वर्षाची मुलगी प्रेग्नंट केले होते. लैंगिक छळ प्रतिबंधक समूहाने या नात्याला  'रोमियो आणि ज्युलियट सारखी' कहाणी म्हणून वर्णन केल्याबद्दल त्यांना फटकारले. बूचार्ड यांनी प्रतिनिधी बनण्याच्या शर्यतीतून बाहेर न पडण्याची शपथ घेतली आणि या घटनेला समोर आणल्याबद्दल 'गलिच्छ राजकारण'ला दोषी ठरवले.

५५ वर्षीय बूचार्ड यांनी गुरुवारी समर्थकांना फेसबुक लाइव्ह व्हिडिओमध्ये एक सामान्य किशोरवयीन मुलाशीसोबत असलेल्या संबंधाबद्दल सांगितले. नंतर त्यांनी कॅस्पर स्टार-ट्रिब्यूनला मुलीचे वयाबद्दल सांगितले. ते म्हणाले, ज्यावेळी मी लहान होतो, तेव्हाची ही एक कहाणी आहे. दोन किशोर, मुलगी प्रेग्नंट राहते. ती माझ्यापेक्षा लहान होती. त्यामुळे ही रोमियो आणि ज्युलियटच्या कहाणीसारखी आहे. 

बूचार्ड यांनी मुलगी १५ वर्षांची असताना तिच्याशी लग्न केले आणि ते १९ वर्षांचे होते आणि दोघे फ्लोरिडामध्ये राहत होते. तीन वर्षानंतर त्यांचा घटस्फोट झाला.  ज्यावेळी मुलगी २० वर्षांची होती, त्यावेळी तिचे निधन झाले, असे बूचार्ड म्हणाले. दरम्यान, ऑनलाइन रेकॉर्ड्समध्ये १९९० साली जॅक्सनविले स्मशानभूमीत दफन झालेल्या महिलेचे नाव आहे. मीडियाने या महिलेची ओळख जाहीर न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

(Mucormycosis : दिल्लीतील दोन रुग्णांमध्ये ब्लॅक फंगसचा दुर्मीळ संसर्ग, चिंता वाढली)

२०२० मध्ये चेनी यांच्या विरोधात निवडणूक लढविणार्‍या किमान आठ रिपब्लिकनपैकी बूचार्ड यांचा समावेश आहे. त्यांनी अमेरिकेच्या कॅपिटलमध्ये ८ जानेवारी रोजी झालेल्या हिंसाचाराबद्दल माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालविण्यास मतदान केले होते.

हे प्रकरण समोर आणण्यात चेनी यांचा समावेश होता, असे बूचार्ड यांना वाटते. मात्र चेनी यांचे प्रवक्ते जेरेमी अ‍ॅडलर यांनी चेनी यांचा कोणताही सहभाग नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान, त्यावेळी माझ्यावर आणि मुलीवर गर्भपात करण्यासाठी दबाव आणण्यात येत होता, परंतु आम्ही तसे केले नाही, असे बूचार्ड म्हणाले.

टॅग्स :Americaअमेरिका