शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
3
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
4
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
5
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
6
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
7
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
8
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
9
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
10
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
11
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
12
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
13
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
14
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
15
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
16
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
17
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
18
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
19
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
20
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर

Corona Virus : भय इथले संपत नाही! "दर 4 मिनिटाला कोरोनामुळे एकाचा मृत्यू"; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 7:46 AM

Corona Virus : जगभरात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे.

वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जगभरात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना आता मेडिकल इमर्जन्सी नसल्याचं म्हटलं आहे. पण असं असताना देखील धक्कादायक माहिती समोर आली आहे. दर चार मिनिटाला एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, कोरोना कमकुवत लोक आणि कमी लसीकरण असलेल्या देशांना लक्ष्य करत आहे. गेल्या वर्षी हृदयविकार आणि कॅन्सरनंतर अमेरिकेत कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाले. 

कोरोनामुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र अद्यापही आवश्यक लसीकरण आणि मास्क वापरण्याकडे लक्ष दिले जात नाही. वेटरन्स अफेयर्स सेंट येथील क्लिनिकल एपिडेमियोलॉजी सेंटरचे संचालक झियाद अल-एली म्हणाले की कोविड अजूनही बर्‍याच लोकांवर परिणाम करत आहे. आमच्याकडे यापासून वाचण्याचे मार्ग आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले होते की कोरोना आता मेडिकल इमर्जन्सी नाही. त्याच वेळी, बहुतेक देशांनी लॉकडाऊन आणि मार्गदर्शक तत्त्वे आधीच शिथील केली आहेत.

जगभरात लाखो लोकांचा मृत्यू

कोरोना साथीच्या सुरुवातीच्या टप्प्यात खूप खर्च केल्यानंतर, जागतिक नेते सर्वकाही पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, कोरोना संसर्ग विकसित होत आहे, जगभरात लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. काही आठवड्यांपूर्वी भारतात कोरोना व्हायरसची प्रकरणे झपाट्याने वाढत होती. यामुळे देशात पुन्हा एकदा कोविड रुग्णालये सक्रिय झाली आहेत. राष्ट्रीय स्तरावर मॉक ड्रील सुरू झालं. पण काही वेळाने कोरोनाचे रुग्ण थांबू लागले ही दिलासादायक बाब होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

"जगाने पुढच्या महामारीसाठी तयार राहावे; कोरोनापेक्षाही अत्यंत खतरनाक व्हायरस येतोय"    

एका महाभयंकर साथीचा इशारा देण्यात आला आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे प्रमुख डॉ. टेड्रोस अदनोम घेब्रेयसस यांनी धोक्याचा इशारा दिला की जगाने पुढच्या साथीच्या रोगासाठी तयारी करावी, जी कोविड-19 साथीच्या आजारापेक्षाही घातक असू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, डब्ल्यूएचओचे प्रमुख डॉ. टेड्रोस अदनोम म्हणाले की, जगाने कोविडपेक्षाही घातक असलेल्या व्हायरससाठी तयार राहायला हवे. डब्ल्यूएचओ प्रमुखांनी इशारा दिला की, कोरोना अद्याप संपलेला नाही. ते म्हणाले की ते दुसऱ्या रूपात उदयास येण्याचा धोका आहे, ज्यामुळे आजारपण आणि मृत्यू होईल. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना