कोरोनाची साथ अद्याप पूर्णपणे संपलेली नाही. याच दरम्यान धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे, आणखी एका महाभयंकर साथीचा इशारा देण्यात आला आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे प्रमुख डॉ. टेड्रोस अदनोम घेब्रेयसस यांनी धोक्याचा इशारा दिला की जगाने पुढच्या साथीच्या रोगासाठी तयारी करावी, जी कोविड-19 साथीच्या आजारापेक्षाही घातक असू शकते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, डब्ल्यूएचओचे प्रमुख डॉ. टेड्रोस अदनोम म्हणाले की, जगाने कोविडपेक्षाही घातक असलेल्या व्हायरससाठी तयार राहायला हवे. NDTV च्या वृत्तानुसार, WHO च्या प्रमुखांनी 76 व्या जागतिक आरोग्य संमेलनात आपला अहवाल सादर करताना हे सांगितले. ते म्हणाले की कोरोनामुळे किमान 20 मिलियन लोकांचा मृत्यू झाला आहे. अलीकडेच WHO ने घोषणा केली होती की कोविड-19 महामारी आता आरोग्य आणीबाणी नाही.
टेड्रोस यांनी स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे हेल्थ मीटिंगमध्ये सांगितले की, पुढील साथीच्या रोगाला रोखण्यासाठी चर्चा करण्याची वेळ आली आहे. डब्ल्यूएचओ प्रमुखांनी इशारा दिला की, कोरोना अद्याप संपलेला नाही. ते म्हणाले की ते दुसऱ्या रूपात उदयास येण्याचा धोका आहे, ज्यामुळे आजारपण आणि मृत्यू होईल. डब्ल्यूएचओ प्रमुख म्हणाले की जेव्हा पुढची महामारी दार ठोठावत आहे आणि जेव्हा ती येईल हे माहीत असेल तेव्हा आपण निर्णायक, सामूहिक आणि समानपणे प्रतिसाद देण्यासाठी तयार असले पाहिजे.
डॉ. टेड्रोस म्हणाले की, या पिढीने साथीच्या आजाराशी तडजोड न करण्याची खात्री आहे. कारण लहानसा व्हायरस किती भयानक असू शकतो याचा अनुभव या लोकांनी घेतला आहे. 2017 च्या जागतिक आरोग्य संमेलनात घोषित केलेल्या तिप्पट अब्ज उद्दिष्टांच्या प्रगतीवरही महामारीचा परिणाम झाला. टेड्रोस म्हणाले की, कोरोना हेल्थ इमर्जन्सी संपवण्याचा अर्थ कोरोना संपला असा होत नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.