ब्रिटनमधील शेरॉन नावाची एक निवृत्त फार्मासिस्ट महिला २0१५पासून एका कारमध्ये आयुष्य घालवत आहेत. तेही अगदी मजेत. निवृत्त झाल्यानंतर आपण काहीतरी वेगळं करावं, असं त्यांना वाटत होतं. भरपूर फिरावं, अशीही इच्छा होती.कारने फिरता येईल, पण हॉटेलात राहण्यासाठी खूप खर्च येत असल्यानं काय करावं, असा प्रश्न त्यांना पडला होता. मग त्यांनी एक कार विकत घेतली आणि त्यात अनेक बदलही केले. त्यातच स्वयंपाकघर, बाथरूम, त्यात शॉवर, डायनिंग टेबल, टीव्ही, फ्रिजची व्यवस्था असं सारंकाही. विजेसाठी बॅटरीची व्यवस्था. त्यातूनच प्रवास करायचा आणि वाटेल तिथं कारचं घर बनवून तिथंच थांबायचं. मी बराच काळ अपार्टमेंटमध्ये राहत होते. पण शेजारीपाजारी कोण हे मला माहीत नव्हतं. त्यांनाही माझी ओळख नव्हती. अशा एकटेपणाचा मला कंटाळा आला, त्यामुळे मी फिरतं आयुष्य जगायचं ठरवलं. त्यातून अनेक लोक भेटतात. कारचं घर बनताच, अनेक जण उत्सुकतेनं भेटायला येतात, गप्पा मारतात. त्यामुळे वेळ चांगला जातो आणि फिरणंही होतं, असं त्या म्हणतात.
एक निवृत्त फार्मासिस्ट महिला २0१५पासून एका कारमध्ये व्यतित करतेय आयुष्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 4:22 AM