शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईत १ लाख लोक मावतील एवढे स्टेडियम व्हावे”; फडणवीसांची रोहित शर्मा समोरच मागणी
2
Rohit Sharma Suryakumar Yadav, Maharashtra Vidhan Bhavan Felicitation: "तर मी सूर्याला बसवलं असतं.."; विधानभवनात रोहित शर्माची तुफान बॅटिंग, सभागृहात पिकला हशा
3
लोकसभा निकालाचा परिणाम की...? भाजपनं अनेक राज्यांत नियुक्त केले नवे प्रभारी
4
"ऑगस्ट महिन्यात कोसळणार मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार’’, इंडिया आघाडीतील बड्या नेत्याचा दावा 
5
Video: 'माझ्याबद्दल खुप वाईट बोललं गेलं, पण मी...' PM मोदींसमोर हार्दिकने मांडल्या वेदना
6
कॅच हातात बसला, आपण आणखी एक वर्ल्डकप जिंकू; सूर्याचे विधानसभेला मराठीतून आश्वासन
7
मुख्यमंत्र्यांची भेट, नंतर प्रकाश आंबेडकरांची वसंत मोरेंवर टीका; म्हणाले तीन विषयांवर चर्चा...
8
“ओबीसी एकत्र आहोत, मनोज जरांगेंच्या पाडापाडीला आमच्या शुभेच्छा”; लक्ष्मण हाकेंचा पलटवार
9
'मुंबईकर' वर्ल्ड चॅम्पियन्स मुख्यमंत्र्यांच्या भेटीला! रोहित, सूर्या, दुबे, यशस्वी यांचा 'वर्षा'वर सत्कार
10
संगीत सेरेमनी, गृहपूजा, 2 रिसेप्शन अन्...; असा आहे अनंत-राधिकाच्या 14 जुलाईपर्यंत चालणाऱ्या लग्नसोबळ्याचा संपूर्ण कार्यक्रम
11
PM मोदींनी रोहित-विराटशी काय गप्पा मारल्या? द्रविडला काय विचारलं? पाहा धमाल Video
12
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! हजारो नॉन एसी डबे वाढवण्याची रेल्वेची तयारी
13
“अर्थसंकल्प आकड्यांचा खेळ, अदानींच्या सेवेसाठी सेवक काम करत आहेत”; विजय वडेट्टीवारांची टीका
14
अमृतपाल सिंग यांनी घेतली खासदारकीची शपथ, विशेष विमानाने आणले दिल्लीत
15
Mahindra Thar 5 Door ची वाट पहाताय? मग, 3 नवीन फीचर्स मिळू शकतात
16
“वारीत पायी चालत जाणार”; उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती, कुठे अन् कधी होणार सहभागी?
17
नियम बदलले! सीम कार्ड सुरू ठेवायचं असेल तर 'हे' काम करु; नाहीतर नंबर होणार बंद
18
"विश्वविजेते खेळाडू राहिले बाजूला, पक्षफोडेच पुढे पुढे!", विजय वडेट्टीवारांची खोचक टीका  
19
“राहुल गांधींनी कॅट वॉक करायला आषाढी पालखी सोहळ्यात येऊ नये”; भाजप नेत्याची खोचक टीका
20
"विरोधक म्हणतात, महिलांना दरमहा ५ हजार द्या... तुम्ही दमडाही दिला नाही आणि..." अजित पवार यांचा चिमटा

ऋषी सुनक की केयर स्टार्मर, पुढील पंतप्रधान कोण? ब्रिटनमध्ये उद्या निवडणूक 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2024 11:16 AM

या निवडणुकीत कंझर्व्हेटिव्ह पार्टीचे ऋषी सुनक आणि लेबर पार्टीचे केअर स्टार्मर यांच्यात चुरशीची लढत आहे. 

नवी दिल्ली : ब्रिटनमध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहात आहेत. येथील जनता आता आपल्या आवडत्या पंतप्रधानाची निवड करणार आहे. यासाठी ब्रिटनमध्ये उद्या म्हणजेच ४ जुलै रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत कंझर्व्हेटिव्ह पार्टीचे ऋषी सुनक आणि लेबर पार्टीचे केयर स्टार्मर यांच्यात चुरशीची लढत आहे. 

आतापर्यंत आलेल्या सर्व ओपिनियन पोलमध्ये केयर स्टार्मर यांच्या लेबर पार्टीला आघाडी दिसून येत आहे. याचबरोबर, सर्वेक्षणानुसार, ऋषी सुनक यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच, ब्रिटनचे पुढील पंतप्रधान हे केयर स्टार्मर होऊ शकतात, असे मानले जात आहे. परंतु या सर्व गोष्टी उद्या मतदानानंतरच ठरतील. दरम्यान, या दोन नेत्यांपैकी सर्वात श्रीमंत कोण? याबद्दल जाणून घ्या.

ब्रिटनच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या माहितीनुसार, कंझर्व्हेटिव्ह पार्टीचे ऋषी सुनक हे लेबर पार्टीच्या केयर स्टार्मरपेक्षा श्रीमंत आहेत. ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती यांची एकूण संपत्ती जवळपास ६५१ मिलियन पौंड आहे. त्यामागील कारण म्हणजे इन्फोसिसचे शेअर्स आहेत. अक्षता मूर्ती यांचे इन्फोसिसमध्ये महत्त्वपूर्ण शेअर्स आहेत. 

गेल्या वर्षभरात इन्फोसिसच्या शेअर्समध्ये चांगली वाढ झाली आहे. मे महिन्यात प्रसिद्ध झालेल्या संडे टाइम्सच्या रिच लिस्टच्या अहवालानुसार अक्षता आणि ऋषी सुनक यांची संपत्ती ब्रिटनचे राजा चार्ल्स यांच्यापेक्षा जास्त आहे. अहवालानुसार, या वर्षी त्यांच्या संपत्तीत १२० मिलियन पौंड इतकी वाढ झाली आहे. २०२३ मध्ये ५२९ मिलियन पौंडवरून ६५१ मिलियन पौंडपर्यंत वाढ झाली आहे.

याचबरोबर, लेबर पार्टीचे नेते केयर स्टार्मर यांची अंदाजे एकूण संपत्ती जवळपास ७.७ मिलियन पौंड आहे. त्यांची बहुतेक संपत्ती ही त्यांच्या राजकीय आणि कायदेशीर कारकिर्दीतून येते. त्यांच्याकडे जवळपास १० पौंड मिलियन किमतीची जमीन आहे, जी त्यांनी १९९६ मध्ये वकील असताना खरेदी केली होती. केयर स्टार्मर यांची एकूण संपत्ती यूकेमधील सरासरी कुटुंबापेक्षा २५ पट जास्त असली तरी, ऋषी सुनक यांच्या तुलनेत ती कमीच आहे.

६५० जागांवर होणार मतदान दरम्यान, ब्रिटनमध्ये ४ जुलै रोजी एकूण ६५० जागांवर मतदान होणार आहे. सत्ता स्थापन करण्याचा आकडा ३२६ आहे, ज्या पार्टीला इतक्या जागा मिळतील, ती सरकार स्थापन करेल. ब्रिटनमध्ये अनेक दशकांपासून कंझर्व्हेटिव्ह पार्टी आणि लेबर पार्टी यांच्यात लढत पाहायला मिळते. विशेष म्हणजे, याठिकाणी मतपेटीद्वारे मतदान केले जाते. यंदा ब्रिटनमध्ये ५ कोटी मतदार सहभागी होणार आहेत. निवडणुकीसाठी मतदान सकाळी ७ वाजता सुरू होऊन रात्री ११ वाजेपर्यंत चालणार आहे.

ओपिनियन लेबर पार्टीला मोठी आघाडीआतापर्यंतच्या पोलमधील रिपोर्टमध्ये ऋषी सुनक यांच्या पार्टीला धक्का बसला आहे, तर लेबर पार्टीला मोठी आघाडी मिळाली आहे. अनेक ओपिनियन पोलमध्ये लेबर पार्टी खूप पुढे आहे. मार्चमधील पोलमध्ये ऋषी सुनक यांना ३८ रेटिंग देण्यात आले होते, जे सर्वात वाईट रेटिंग होते. एप्रिलमध्ये, YouGov च्या पोलमध्ये असे दिसून आले की, कंझर्व्हेटिव्ह पार्टीला केवळ १५५ जागा मिळतील. तर लेबर पार्टीला ४०३ जागा मिळतील असा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे ओपिनियन पोलनुसार, ऋषी सुनक यांच्या पार्टीला मोठा पराभव पत्करावा लागू शकतो, असा दावा सर्वेक्षणात करण्यात येत आहे. हे सर्वेक्षण १८ हजार लोकांवर आधारित आहे.

टॅग्स :Rishi Sunakऋषी सुनकElectionनिवडणूक 2024Internationalआंतरराष्ट्रीय