जिनेव्हा - वेगाने पसरत असलेल्या कोरोना विषाणुमुळे चीनमध्ये आतापर्यंत 200 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या आजाराचे गांभीर्य विचारात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने गुरुवारी कोरोना विषाणूला आंतरराष्ट्रीय आणीबाणी घोषित केले आहे. कोरोना विषाणूच्या संकटाचा सामना करण्यासाठी योग्य तो समन्वय साधण्यासाठी आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटनेने हा निर्णय घेतला आहे. ज्या देशांमधील आरोग्य यंत्रणा कमकुवत आहे, अशा देशांमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव होण्यापासून रोखणे ही चिंतेची बाब आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अॅडनम यांनी सांगितले. याबाबत टेड्रोस यांनी सांगितले की, आम्ही सर्वांनी एकत्र मिळून कोरोना विषाणूचा फैलाव रोखला पाहिजे. केवळ आम्ही सर्वजण एकत्र येऊन या संकटाचा सामना करू शकतो.'' टेड्रोस यांनी गेल्या आठवड्यात चीनचा दौरा केला होता. तसेच चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची भेट घेतली होती.कोरोना विषाणूचा धोका वाढल्यानंतर प्रवास आणि व्यापारावर निर्बंध घालण्यासारखे उपाय योजण्यात आले आहेत. मात्र अशा उपायांची गरज नाही, असेही टेड्रोस यांनी सांगितले. दरम्यान, कोरोना विषाणूचा धोका उत्पन्न झाल्यानंतर अनेक देशांनी आपल्या नागरिकांना वुहानला न जाण्याचा सल्ला दिला आहे. तसेच वुहानमधून येणाऱ्या लोकांवरही बंदी घातली आहे. तर रशियाने चीनकडील आपली पूर्व सीमा बंद केली आहे.
‘कोरोना’ आरोग्य यंत्रणेला अलर्ट
कोरोना विषाणूमुळे चीनमध्ये अडकले महाराष्ट्रातील 7 विद्यार्थी
कोरोना साथ : दक्षता हवी, भय नकोदरम्यान, कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण केरळमध्ये आढळून आल्याने देशात घबराट पसरली आहे. वुहान विद्यापीठामध्ये शिकणारा विद्यार्थी केरळमध्ये परतल्यानंतर त्याची तपासणी करण्यात आली. त्याला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. मुंबईत दाखल केलेल्या सहापैकी तिघांना कोरोना नसल्याचे निष्पन्न झाले आहे.दिल्लीत ज्या तिघांना डॉ. राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यांना कोरोनाचा संसर्ग झालेला नाही, असे डॉक्टरांनी सांगितले. मात्र मुंबईच्या दहिसरमधील एका तरुणाला गुरुवारी कोरोनाच्या संशयामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तो अन्य देशांतून शांघायमार्गे भारतात आला आहे, असे सांगण्यात आले. मुंबईसह देशातील सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळांवर परदेशांतून येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी होत आहे.