लंडन : भारतातील परिसर आणि घरगुती वायू प्रदूषणाचा हृदयाशी संबंधित आजार होण्याच्या वाढत्या जोखमीशी आहे, असा निष्कर्ष एका संशोधनपूर्ण अध्ययनातून काढण्यात आला आहे. स्पेनमधील बार्सिलोना जागतिक हृदयारोग्य संस्थेने परिसर आणि घरगुती वायू प्रदूषण धमणी काठिण्य यांच्यातील परस्पर संबंधाबाबत पहिल्यांदाच अभ्यासपूर्ण संशोधनांती हा निष्कर्ष काढला.या संस्थेने भारतातील दक्षिण भागातील हैदराबाद आणि तेलंगणातील उपनगरी आणि शहरी भागालगतच्या वस्त्यांतील ३३७२ लोकांच्या तपासणी केल्या.हे अध्ययन आंतरराष्टÑीय रोगपरिस्थिती विज्ञान नियतकालिकात प्रकाशित करण्यात आले आहे. यात ३,३७२ लोकांच्या मान, मेंदू, चेहर आणि हृदयातील रक्तवाहिन्यांतील मध्यम स्तराची जाडी (कॅरोटिड इंटिमा-मेडिया थिकनेस-सीआयएमटी) मोजमाप घेण्यातआले.बार्सिलोन इन्स्टिट्यूट फॉर ग्लोबल हेल्थ या संस्थेच्या संशोधक कॅथरीन टोनी यांनी सांगितले की, आमच्या निष्कर्षातून आढळले की, अल्प आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांत वायू प्रदूषणावर अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. कारण लोकसंख्या वायू प्रदूषणाच्या प्रमाणामुळे उच्च उत्पन्न असलेल्या देशांच्या तुलनेत या देशांतील अध्ययनातील निष्कर्षात मोठी तफावत असू शकते. (वृत्तसंस्था)।या संस्थेच्या संशोधक पथकाने लोकांना स्वयंपाक तयार करण्यासाठी कोणत्या प्रकारचे इंधन वापरतात, असे विचारले असता यापैकी ६० टक्के लोकांनी जैव पदार्थाचा वापर करीत असल्याचे सांगितले. जैव इंधनाचा स्वयंपाकासाठी वापर करणाऱ्या लोकांत विशेषत: खेळती हवेची सोय नसलेल्या ठिकाणी सीआयएमटीचे प्रमाण अधिक होते. हे अध्ययन भारतासारख्या रोग प्रादुर्भाव, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि लठ्ठपणाला सामोरे जाणाºया देशांसाठी प्रासंगिक आहे.
भारतात प्रदूषणामुळे हृदयाच्या आजाराचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2019 6:04 AM