वॉशिंग्टन : कोरोनाशी दोन हात करण्यात व्यग्र असताना जगाचे प्राणघातक पोलिओ विषाणूकडे दुर्लक्ष झाले. अफगाणिस्तानात यादवीसदृश स्थिती व पाकमधील पूर यामुळे दोन्ही देशांत यंदा पोलिओचे रुग्ण वाढले आहेत. भारतात याचा शिरकाव होण्याचा धोका आहे. हा विषाणू कोरोनापेक्षा चौपट लहान मात्र प्रसाराबाबत चौपटीने वेगवान आहे.
कोरोनाविरोधातील लढाई आपण जिंकत असतानाच अचानक अमेरिका, युरोपपासून भारतापर्यंत पोलिओचा धोका वाढू लागला आहे. हा विषाणू आढळल्यानंतर न्यूयॉर्कमध्ये आणीबाणी घोषित केली आहे. वेळेवर लसीकरण न झाल्याचा हा परिणाम असल्याचे युनिसेफचे मत आहे.
जगभर का वाजली धोक्याची घंटा?
यावर्षी न्यूयॉर्कच्या तीन जिल्ह्यांच्या (काउंटी) सांडपाण्यात पोलिओचा व्हायरस आढळला. जूनमध्ये लंडन शहरातील सांडपाण्यात हा विषाणू आढळून आला होता. पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यातील सांडपाण्यातही हा विषाणू आढळून आला आहे. २५ ऑक्टो. २०२२ पर्यंत पाकमध्ये पोलिओचे २० व अफगाणिस्तानमध्ये २ रुग्ण आढळून आले.
पाकमधील महापुराने तसेच अफगाणिस्तानातील यादवीने स्थलांतर वाढले आहे. हे दोन्ही देश भारताजवळ आहेत. त्यामुळे धोका वाढतो. - दीपक कपूर, अध्यक्ष, राष्ट्रीय पोलिओ प्लस समिती, रोटरी