डोमेनिकन रिपब्लिक येथून न्यूयॉर्कमध्ये आलेल्या व्यक्तिने दहा पौंड कोकेनची तस्करी केली ती त्याच्या अंडरवेअरमधून. अमेरिकेच्या कस्टम्स आणि बॉर्डर प्रोटेक्शनच्या अधिकाऱ्याने सांगितले की जुआन कार्लोस गॅलॅन ल्युपेरोन हा अमेरिकेचा नागरिक असून चार मार्च रोजी तो जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला. त्याच्या अंगात जी पँट होती ती काहीशी घट्ट बसल्यासारखे दिसत होते. शिवाय त्याच्या हालचालीही घाबरल्यासारख्या होत्या. तो डोमिनिकन रिपब्लिकमधील सँटो डोमिंगो येथे प्रवास करून आला होता. ल्युपेरोनची अधिकाऱ्यांनी खोलीमध्ये झडती घेतली. तीत त्याने त्याच्या पायाभोवती दहा पौंड कोकेन असलेल्या नलिका चिकटवलेल्या दिसल्या. या कोकेनची किमत १,६४,००० अमेरिकन डॉलर आहे. हे कोकेन जप्त करण्यात आल्यामुळे अमेरिकेचे बेकायदा अमली पदार्थांपासून संरक्षण करण्यास कस्टम्स आणि बॉर्डर पोलिस किती दक्ष आहेत हे दिसते, असे या विभागाचे न्यूयॉर्कचे कार्यकारी संचालक लिओन हेवर्ड यांनी सांगितले. ल्युपेरोन याला अटक झाली. त्याची अमली पदार्थांची तस्करी केल्याबद्दल होमलँड सिक्युरिटीकडून चौकशी होईल.
कोकेनच्या तस्करीसाठी अशी घेतली जोखीम
By admin | Published: March 15, 2017 12:50 AM