जर तुम्ही कुठे बाहेर जाण्यासाठी सर्व तयारी केली असेल आणि कंपनी तुम्हाला रजा देत नसेल, तर अशा परिस्थितीत तुम्ही सिक लिव्हच्या नावाखाली सुट्टी घेतली, तर तुम्हाला अशी रजा घेणं भारी पडू शकतं. तुमची नोकरीही धोक्यात येऊ शकते. म्हणूनच, जर तुम्ही कुठे फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर सर्वप्रथम कंपनीकडून तुमची रजा मंजूर करून घ्या. अन्यथा, तुम्हाला नंतर अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.
असाच एक प्रकार समोर आला आहे ज्यात एक कर्मचारी सिक लिव्ह घेऊन परदेशात सुट्टी एन्जॉय करत होता. सुट्टीनंतर तो घरी परतत असताना एका कर्मचाऱ्यानं त्याला विमानतळावर पाहिलं आणि सिक लिव्हच्या नावावर तो परदेशात फिरण्यास गेल्याचं सांगितलं.
कुठलं आहे प्रकरण?याबाबत माहिती मिळाल्यानंतर कंपनीनं त्या कर्मचाऱ्याला त्वरित काढून टाकलं. परंतु त्याला काढून टाकणं कंपनीलाच भारी पडलं आणि कंपनीला ७३ लाखांचा दंड ठोठावण्यात आला. कंपनीला नुकसान भरपाई म्हणून ते कर्मचाऱ्याला द्यावे लागले.हे प्रकरण चीनची राजधानी बीजिंगमधील आहे.
जुलै २०१९ मध्ये कर्मचाऱ्यानं दोन आठवड्यांच्या पेड लिव्हसाठी अर्ज केला होता. परंतु कामाच्या दबावामुळे मॅनेजरनं त्याची सुट्टी रद्द केली. त्यावेळी कर्मचाऱ्यानं आपण आधीपासूनच तिकिट बुकिंग केल्याचंही सांगितलं. याशिवाय को कर्मचारी १९९८ पासून कंपनीत कार्यरत होता.
सिक लिव्हच्या नावे सुट्टीयानंतर त्यानं १४ दिवसांच्या सिक लिव्हसाठी अर्ज केलं. तसंच त्यानं चक्कर येणं आणि सर्वाइकल स्पॉन्डिलिसिसचा त्रास होत असल्याचं सर्टिफिकेट दिलं. यानंतर कंपनीनं त्याला बेड रेस्टची गरज असल्यानं सुट्टी मंजूर केली. परंतु तो जेव्हा फिरण्यास बाहेर गेला, त्यावेळी येताना त्याच्या सहकाऱ्यानं त्याला विमानतळावर पाहिलं आणि कंपनीत माहिती दिली. यानंतर त्याला कंपनीनं कामावरून काढून टाकलं.
परंतु हवाबदलासाठई आपण प्रवास केल्याचं त्यानं सांगितलं. तसंच बीजिंग चाओयांग ऑर्बिट्रेशन कमिशनमध्ये अर्ज केला. त्यानंतर त्या ठिकाणी त्याच्या बाजूनं निर्णय लागला आणि अवैधरित्या कामावरून काढण्यासाठी ७३ लाखांचा दंडही ठोठावला. परंतु यानंतर थर्ड इंटरमिडिएट पिपल्स कोर्टाच्या कर्मचारी खोटं बोलत असल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर त्याला कामावरून काढण्याच्या निर्णय न्यायालयानं कायम ठेवला. तसंच त्याला देण्यात येणारी नुकसान भरपाई देखील गमवावी लागली.