टोक्यो : बुद्ध धर्माच्या रीतिरिवाजांनुसार अंत्यसंस्कार करण्यासाठी यंत्रमानव धार्मिक सूत्रांचे पठण करील, असे सॉफ्टवेअर जपानी कंपनीने तयार केले आहे. पेपर असे या यंत्रमानवाचे नाव आहे.संगणकाच्या आवाजात हा पेपर यंत्रमानव विधीच्या सूत्रांना म्हणतो व दुसरीकडे ढोलही वाजवतो. हा यंत्रमानव २३ आॅगस्ट रोजी टोक्यामध्ये अंत्यसंस्काराला लागणाºया वस्तू आणि साहित्याच्या उत्पादक कंपन्यांनी भरवलेल्या लाइफ एंडिंग इंडस्ट्री एक्स्पो नावाच्या प्रदर्शनात मांडण्यात आला होता. निस्सेई इको कंपनी या यंत्रमानवाने सूत्रांचे पठण करावे यासाठी सॉफ्टवेअर तयार केले. सॉफ्टबँक ग्रुप कॉर्पोरेशनने २०१४ मध्ये हा यंत्रमानव तयार केला होता.जपानमधील लोकसंख्या खूप वेगाने वयोवृद्ध बनत आहे. अनेक बौद्ध धर्मगुरूंना त्यांच्या समाजातून खूप कमी आर्थिक आधार मिळतो, त्यामुळे ते आपल्या देवळातील कामांशिवाय बाहेर अर्धवेळ कामे शोधतात, असे निस्सेईचे कार्यकारी सल्लागार मिशिओ इनामुरा यांनी सांगितले. ज्यावेळी बौद्ध धर्मगुरू अंत्यसंस्कार विधींसाठी उपलब्ध होणार नाहीत त्यावेळी ते काम हे यंत्रमानव करतील. प्रत्येक अंत्यसंस्कारासाठी या यंत्रमानवावर खर्च होतील ५० हजार येन (४५० अमेरिकन डॉलर). हेच काम धर्मगुरूकडून करून घेण्यासाठी २,४०,००० येन (२,२०० अमेरिकन डॉलर) खर्च येईल. अजून हा यंत्रमानव अंत्यविधीसाठी कोणी वापरलेला नाही.
जपानमध्ये अंत्यविधीची सूत्रेही म्हणणार यंत्रमानव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 3:13 AM